Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IncomeTaxUpdate : “आयटीआर” भरायचे राहिले असेल तर हि बातमी तुमच्यासाठी आहे…

Spread the love

मुंबई : ज्या आयकर दात्यांना ३१ जुलैच्या आत आपले आयटीआर भारत आले नाहीत त्यांच्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत संधी देण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टक्के लोकांनी अजूनही आयटीआर भरलेला नसल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. या करदात्यांना आता उशीरा आयटीआर दाखल करण्यासाठी पाच महिन्यांची मुदत अर्थ मंत्रालयाने दिली आहे.


या मुदतीच्या आतही आयटीआर दाखल करू न शकणाऱ्या करदात्याला मोठ्या दंडासह आयकराच्या नोटिसीला सामोरे जावे लागेल असे आयकर विभागाने म्हटले आहे. त्यांच्यावर कलम २३४F नुसार कारवाई केली जाईल. नव्या निर्णयानुसार या अंतर्गत करदाते ३१ डिसेंबरपर्यंत आयटीआर दाखल करू शकतात. म्हणजेच करदात्यांना एकूण पाच महिने मिळाले आहेत. मात्र यासाठी प्रथम त्यांना दंड भरावा लागेल, दंडाची रक्कम वेगवेगळ्या उत्पन्न गटांसाठी वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. त्याच वेळी, विभागाने आयटीआर पडताळण्यासाठी फक्त ३० दिवस दिले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात पडताळणीची वेळ १२० दिवस होती.

मागील वर्षाच्या तुलनेने कमी झाले आयकरदाते…

प्राप्तिकर विभागाच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्ष २०२३ साठी आयटीआर  भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलैपर्यंत एकूण ५.८३ कोटी करदात्यांनी आयटीआर भरले आहेत. तर मागील आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ७.१४ कोटी करदात्यांनी आयटीआर भरला होता. अशाप्रकारे यावेळी १८ टक्के म्हणजेच १.३१ कोटी करदात्यांनी आयटीआर दाखल केलेला नाही.

दरम्यान करदाते आयटीआर भरण्याच्या मुदतीत वाढ होण्याची प्रतिक्षा करत होते. मात्र मुदत न वाढल्याने मोठ्या संख्येने करदात्यांनी आयटीआर भरला नसल्याचे समोर आले आहे.  करदाते ३१ जुलैनंतर उशीरा आयकर रिटर्न दाखल करू शकतात. मात्र असे केल्यावर प्राप्तिकर कायद्याच्या कलम २३४F अंतर्गत उशीरा दंड जमा करावा लागेल. पाच लाखांपेक्षा कमी उत्पन्न गटातील करदात्यांना उशिरा दंड म्हणून १,००० रुपये भरावे लागतील. तर ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांना ५,००० रुपये दंड भरावा लागेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!