Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मथुरा -वृन्दावनमधील एका सफाई कामगाराला जावे लागले घरी , कारण पाहून तुम्हालाही बसेल धक्का…

Spread the love

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मथुरा येथून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे फोटो कचऱ्याच्या ट्रकमध्ये दिसले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिकेने सध्या गाडी चालवणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकले आहे.

दरम्यान लोकांनी महामंडळाच्या कर्मचाऱ्याला थांबवून पंतप्रधानांसह इतर लोकांचे फोटो कचऱ्याच्या गाडीत ठेवण्याबाबत विचारणा केली असता, याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असे सांगितले. कचऱ्यात फेकले होते म्हणून मी उचलून आणले. मथुरेत कचऱ्याची गाडी घेऊन जाणाऱ्या या कर्मचाऱ्याला काही भाविकांनी पहिले आणि अडवले. यानंतर कर्मचारी आणि त्याच्या गाडीचा व्हिडिओ बनवला.

मात्र, ही घटना उघडकीस आल्यानंतर काही लोक कचऱ्यातून सर्व फोटो धुतानाही दिसले. एका व्यक्तीने सांगितले की, आम्ही मोदीजी आणि योगीजींचे फोटो अलवरला घेऊन जाऊ. तो या देशाचा आत्मा आहे, त्यामुळे त्याला अशा कचऱ्यात टाकता येणार नाही. ही घटना समोर आल्यानंतर सोशल साइट्सवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी म्हटले की, पीएम मोदी आणि योगी आदित्यनाथ हे संवैधानिक पदावर बसले आहेत, अशा परिस्थितीत त्यांचा फोटो अशा कचऱ्याने ठेवणे योग्य नाही.

या घटनेची माध्यमातून माहिती मिळताच मथुरा-वृंदावनचे  सत्येंद्र कुमार तिवारी, अतिरिक्त महापालिका आयुक्त, यांनी तत्काळ घटनेची दखल घेत संबंधित कर्मचारी बॉबी उर्फ दुलीचंद याने हि चूक केल्याबद्दल त्याला कामावरून बडतर्फ करण्यात आले आहे. सुभाषचंद्र महाविद्यालयातून कचरा उचलताना  त्याला हे फोटो फेकलेल्या अवस्थेत आढळून आले होते.  मथुरेतील एका नागरिकाने या प्रतिमांना स्वच्छ केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!