Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : अग्निपथ योजने’विरोधात निदर्शने सुरूच, बिहारमध्ये ट्रेन जाळली; भाजप आमदारावर हल्ला

Spread the love

जहानाबाद : सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात दुसऱ्या दिवशीही निदर्शने सुरू आहेत. विशेषत: बिहारमध्ये तरूणांकडून केंद्राच्या नव्या योजनेला विरोध होत आहे. गुरुवारी राज्यातील जेहानाबाद, नवादा, कैमूर, छपरा, मोतिहारी आणि सहरसा येथे निदर्शनांच्या बातम्या येत आहेत. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांमध्ये रेल्वेचे डबेही जाळण्यात आले आहेत. तर नवादा येथे भाजप आमदार अरुणा देवी यांच्यावर हल्ला करण्यात आला असून याच कारणावरून एका तरुणाने हरियाणाच्या रोहटकतमध्ये आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. 


य विषयीची अधिक माहिती अशी कि , अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ जहानाबादच्या तरुणांनी काको मोरजवळ जाळपोळ करून NH-83 आणि NH-110 रोखून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. येथे काही तरुणांनी रेल्वे ट्रॅकवर ठिय्या आंदोलन केल्याने पाटणा-गया रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.नवादा येथे भाजप आमदार अरुणा देवी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे, तर गोपाळगंजमध्ये गोरखपूर-पाटलीपुत्र एक्सप्रेस ट्रेन जाळण्यात आली आहे.

मेट्रोवर दगडफेक

जेहानाबादमध्ये ट्रॅक अडवणाऱ्या विद्यार्थ्यांनी ट्रेनवर दगडफेक केली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. जेहानाबाद स्टेशनजवळ दगडफेक झाली, त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांचा पाठलाग करून रेल्वे ट्रॅक मोकळा केला. येथे नवादा, आराह, सहरसा येथेही तरुणांची रेल्वे स्टेशनवर आणि रस्त्यावर निदर्शने सुरू आहेत. आराहमध्ये तरुणांनी रेल्वे स्थानकावर गोंधळ घातला, त्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना हुसकावून लावले.

दुसरीकडे  सहरसा येथे सैन्य भरती परीक्षा रद्द करून वयोमर्यादा कमी केल्याच्या निषेधार्थ उमेदवारांनी ट्रेन रोखून निदर्शने केली. उमेदवारांनी दिल्लीकडे जाणाऱ्या क्लोन हमसफर, वैशाली सुपरफास्ट आणि पाटणा-जाणाऱ्या राजराणी सुपरफास्ट गाड्या तासन्तास थांबवल्या आहेत. त्याचवेळी कैमूर जिल्ह्यात तरुणांच्या कामगिरीच्या बातम्या येत आहेत. जिल्ह्यातील भाबुआ रोड स्थानकावर तरुणांकडून गाड्यांची तोडफोड केली जात आहे. दगडफेकीमुळे इंटरसिटी एक्सप्रेसच्या अनेक काचा फुटल्या. आंदोलकांनी रेल्वेची बोगीही जाळली. बुधवारी बिहारमधील मुझफ्फरपूर, आरा, बक्सर, बेगुसराय येथे निदर्शने झाल्याचे वृत्त आहे.

बिहारबरोबरच उत्तर प्रदेशातही तरुणाईची निदर्शने सुरू आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये सकाळपासून शेकडो तरुण निदर्शने करत होते. अशा स्थितीत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सौम्य बळाचा वापर करून सर्वांना हुसकावून लावले.

हरियाणात तरुणाची आत्महत्या

दरम्यान सैन्य भरतीसाठी दोन वर्षांपासून जिवतोड मेहनत करणाऱ्या हरियाणाच्या रोहतकमधील एका पीजी हॉस्टेलमध्ये सचिन नावाच्या तरुणाने गळफास लावून घेतला. तो जींदच्या लिजवानाचा रहिवासी आहे. त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला सैन्यात भरती व्हायचे होते, यासाठी तो खूप मेहनत घेत होता, अशी माहिती दिली आहे.

पोलिसांनी हॉस्टेलमधील त्याच्या सहकाऱ्यांची चौकशी सुरु केली आहे. सकाळी पीजीच्या तरुणांनी त्याचा मृतदेह दोरीला लटकताना पाहिला आणि हॉस्टेल संचालकाला माहिती दिली. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. त्याच्यासोबत त्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणाने मीडियाला सांगितले की, लष्करात भरतीसाठी तो दोनदा क्वालिफाय झाला होता. मात्र, भरती झाली नाही. यामुळे तो त्रस्त होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!