Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RahulGandhiNewsUpdate : पुन्हा शुक्रवारीही राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी , देशभर सर्वत्र निदर्शने 

Spread the love

नवी दिल्ली :  नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केली. यापुढेही ईडी राहुल गांधींची चौकशी करणार आहे. त्यांना पुन्हा शुक्रवारी तपास यंत्रणेने बोलावले आहे. राहुल गांधी यांची इन कॅमेरा चौकशी करण्यात आली. बुधवारी राहुल गांधींना त्यांच्या यंग इंडिया स्टेकशी संबंधित कागदपत्रांवर आधारित सुमारे 35 प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान राहुल गांधी तपासात सहकार्य करत नसल्याचे ईडीच्या सूत्रांनी म्हटले आहे. 

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी चौकशीच्या आज  तिसऱ्या दिवशी सकाळी 11.35 वाजता दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालय (ED) मुख्यालयात पोहोचले होते.

या प्रकरणात आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्ष कार्यालय आणि ईडी मुख्यालयाच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आले. या आंदोलकांमध्ये  अधीर रंजन चौधरी, भूपेश बघेल आणि पवन खेरा यांच्यासह पक्षाच्या अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश होता.  तत्पूर्वी, काँग्रेस पक्षाने भाजप सरकारवर काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाच्या मुख्यालयात जाण्यापासून रोखून राजकीय हालचाली ठप्प केल्याचा आरोप करीत सत्ताधारी सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.

सोनिया गांधी यांना २३ जूनला हजर राहण्याच्या सूचना

दरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी कोरोनामुळे आजारी असून सर गंगाराम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दुसरीकडे, ईडीची चौकशी संपल्यानंतर राहुल गांधी काल रुग्णालयात गेले होते. याच प्रकरणी ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना २३ जूनला हजर राहण्यास सांगितले आहे.

ईडीने सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 10 तासांपेक्षा जास्त चौकशी केली. यानंतर ईडीने त्यांना  मंगळवारी पुन्हा हजर राहण्यास सांगितले. राहुल गांधी सलग तिसऱ्या  दिवशी मंगळवारी सकाळी ११.०५ वाजता एपीजे अब्दुल कलाम रोडवरील ईडीच्या मुख्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही होत्या.

तब्बल ३० तास चौकशी

मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) अनेक सत्रांत त्यांचे जबाब नोंदवले गेले आणि मंगळवारच्या चौकशीनंतर, ईडीने आतापर्यंत सुमारे 30 तास त्यांची चौकशी केली आणि आजही चौकशी सुरू आहे. दुसरीकडे, राहुल गांधींच्या ईडीच्या चौकशीच्या तिसऱ्या दिवशीही काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यानंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेत  काँग्रेस मुख्यालयाशेजारील परिसरात पोलिसांनी कलम 144 लागू केले आहे.

काय आहे प्रकरण ?

ईडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ‘यंग इंडियन’ आणि ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ (एजेएल) च्या स्टेक पॅटर्न, आर्थिक व्यवहार आणि प्रवर्तकांची भूमिका समजून घेण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि गांधी कुटुंबाची चौकशी ही ईडीच्या चौकशीचा एक भाग आहे. ‘यंग इंडियन’च्या प्रवर्तक आणि भागधारकांमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह इतर काही काँग्रेस सदस्यांचा समावेश आहे. दिल्लीतील एका ट्रायल कोर्टाने ‘यंग इंडियन’ विरुद्ध आयकर विभागाच्या तपासाची दखल घेतल्यानंतर, एजन्सीने या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली असून या तरतुदींनुसार नवीन गुन्हा दाखल करण्यात आला.

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ मध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. स्वामींनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांवर फसवणूक आणि निधीच्या गैरव्यवहाराचा कट रचल्याचा आरोप केला होता आणि म्हटले होते की यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडने एजेएलवर काँग्रेसला 90.25 कोटी रुपये वसूल करण्याचा अधिकार मिळवण्यासाठी केवळ 50 लाख रुपये दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!