Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalNewsUpdate : राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांची मोर्चेबांधणी , पवारांचे नाव आल्यास…. पटोले यांनी दिली हि प्रतिक्रिया

Spread the love

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकानंतर आता राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यासाठी १५ जून रोजी सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची  दिल्ली येथे बैठक होत आहे. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी बिगर भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच २२ विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.


या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या तसेच आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे.  राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून कोण उमेदवार असेल यावर प्रामुख्याने या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची अधिसूचना १५ जून रोजी जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ जून आहे. ३० जूनपर्यंत अर्जाची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ जुलै आहे. १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल.

दरम्यान, ही निवडणूक भाजपासाठी सोपी असली तरी विरोधक देखील या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव समोर येत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा राहील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकासाठी शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असावेत का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना “महाराष्ट्राचा व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल आणि शरद पवार यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे,” असे नाना पटोले म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!