Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : प्रेषित मोहंमद पैगंबर विवाद : शर्मा- जिंदाल यांच्या अटकेसाठी देशभर मुस्लिमांचे आंदोलन

Spread the love

नवी दिल्ली : भाजपची निलंबित  प्रवक्ता नुपूर शर्माच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानावर देशातील मुस्लिम समाजाने आपला तीव्र निषेध व्यक्त करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. उत्तर प्रदेशातील कानपूर येथे  गेल्या शुक्रवारी नमाजानंतर कानपूरमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. त्यानंतर आता आजही नमाजानंतर महाष्ट्रासह दिल्ली,  तेलंगाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यात मुस्लिम समाजाकडून तीव्र आंदोल करण्यात आले.


दिल्ली येथील  जामा मशिदीबाहेर मोठ्या संख्येने एकत्र येऊन मुस्लिम समाजाच्या वतीने नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदालविरोधात आंदोलन केले ज्याचे पडसाद देशातील अनेक राज्यात उमटले . महाराष्ट्रातील संवेदनशील अशा औरंगाबाद, परभणी, सोलापूर, जालन्यातही  हजारोंच्यां संख्येने मुस्लिम लोक रस्त्यावर आले होते मात्र राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी सांगितले.

मुंबत, नवी मुंबई , पनवेल , ठाण्यातही या प्रकरणात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोलापूरमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेसाठी एमआयएम पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तर, औरंगाबादमध्येही शेकडोंच्या संख्येने जमाव विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. यावेळी खासदार इम्तिजाय जलील यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले.

देशभर निदर्शने, प्रयागराज येथे दगडफेक

नुपूर शर्मा आणि नवीन जिंदालविरोधात दिल्लीसह उत्तर प्रदेशातील प्रयागराज, सहारनपूर, मुरादाबादसह लुधियाना आणि तिकडे पश्चिम बंगालमधील कोलकातामध्येही मुस्लिम समाजाकडून जोरदार विरोध प्रदर्शन झाले. प्रयागराजमध्ये नमाजानंतर पोलिसांवर जोरदार दगडफेक झाली. गेल्या एका तासापासून विविध परिसरात दगडफेक सुरू आहे. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान प्रयागराजच्या अटालापरिसरात शुक्रवारच्या नमाजानंतर शेकडो लोक जमा झाले आणि घोषणाबाजी सुरू केली. यावळी पोलीस त्यांना समजावण्यास गेली असता, त्यांनी दगडफेक सुरू केली. यात लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेकांनी पोलिसांवर दगडफेक केली. अजूनही अनेक ठिकाणी वातावरण शांत झाले नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

महाराष्ट्रात शांततेत आंदोलन

आजच्या घडामोडींबाबत माहिती देताना राज्याचे  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, भाजपच्या निलंबित  प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात आंदोलन होणार असल्याची माहिती कालच पोलिसांना मिळाली होती. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आज सोलापूर, औरंगाबाद, जालनासह राज्यातील ठिकठिकाणी मुस्लीम समाजाने शांततेने हे आंदोलन केले. सर्वोच्च श्रद्धास्थानाबद्दल जर कुणी अशाप्रकारे चुकीचे उद्गार काढत असेल तर तो राग येणे स्वभाविक आहे असं त्यांनी सांगितले.

वळसे पाटील पुढे म्हणाले कि , नुपुर शर्मा, नवीन कुमार जिंदाल यांच्याविरोधात महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु केंद्रीय गृहखात्याने याबाबत कारवाई करायला हवी. महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींवर महासंचालक, आयुक्त , जिल्हा पोलीस अधीक्षक आपापल्या शहरावर आणि जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहेत. क्काय्यद आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. आवश्यकता वाटल्यास राखीव पोलीस दल सज्ज होते. पोलिसांनी शांतपणे परिस्थिती हाताळली. मुस्लीम समाजानेही शांततेत आंदोलन केले कुठेही कटुता निर्माण झाली नाही. आपली श्रद्धास्थाने आहे. त्याचा आदर आपण करतो. दुसऱ्याच्या श्रद्धास्थानाचा अनादर करण्याचं काम कुणीही करू नये. कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सर्व समाजातील लोकांनी सहकार्य करावे असे  आवाहनही त्यांनी केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!