Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील पीएसआय लाचेच्या जाळ्यात

Spread the love

औरंगाबाद-बिडकीन पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या आणि नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झालेल्या एका आर्थिक गुन्ह्यात संशयित आरोपीला सहकार्य करण्यासाठी पाच हजारांची लाच मागून त्यातील तीन हजार रुपये स्वीकारताना ग्रामीण पोलीस अधीक्षक कर्यायलातील आर्थिक गुन्हे शाखेचा फौजदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. बिडकीनमध्ये ही कारवाई करण्यात आली. गेल्या दीड वर्षात तक्रारदाराकडून २५ हजारांची लाच खाणारा हा फौजदार शेवटचे ५ हजार स्वीकारताना मात्र अडकला, हे विशेष.


भाऊसाहेब जमदाडे (५७, रा. भक्तीनगर, प्लॉट नं. १३०, पिसादेवी रोड औरंगाबाद) असे आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव असून,तो आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संबंधित प्रकरणातील तक्रारदारासह एकूण ७१ जणांविरुद्ध बिडकीनच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पीक कर्जाच्या वाटपात झालेल्या फसवणुकीच्या अनुषंगाने बिडकीन पोलिस ठाण्यात २०२१च्या सुरुवातील गुन्हा दाखल झाला होता. हे फसवणुकीचे प्रकरण २५ लाखांपेक्षा अधिक रकमेचे असल्याने त्याचा तपास बिडकीन पोलिस ठाण्यातून औरंगाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. हा तपास फौजदार या नात्याने भाऊसाहेब मुरलीधर जमधडे यांच्याकडे होता.

३० हजार रुपयांची मागणी केली होती….

या प्ररकणात आरोपी म्हणून समावेश न करण्यासाठी जमधडे यांनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने ती मान्य करून मध्यस्थांच्या माध्यमातून त्यापैकी २५ हजार रुपये जमधडे याला याआधीच दिलेही होते. पण जमधडेंची भूक भागली नव्हती.त्यातच १८ मे २०२२ रोजी तक्रारदाराला या प्रकरणात अटक झाली होती. मात्र, त्यांना एका दिवसातच जामीन मिळाला. हा जामीन मिळवून देण्यासाठी आपण मदत केली असून, त्यामुळे ३० हजारांपैकी उर्वरित ५ हजार रुपये द्यावेत म्हणून जमधडे याने तक्रारदाराच्या मागे तगादा लावला होता.

मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीची पडताळणी केल्यावर जमधडे यांनी पाच हजारांची लाच मागून तीन हजारांवर तडजोड केल्याचे निष्पन्न झले. त्यानुसार एसीबीच्या सांगण्यावरून तक्रारदाराने आज जमधडे यांना बिडकीन येथे पैसे घेण्यासाठी बोलावले. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने सापळा रचलेला होता. बिडकीन येथे येऊन पंचासमक्ष पैसे स्वीकारत असतानाच जमधडे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरोधात बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.

यांनी केली कारवाई…

लाचलुचपत प्रतीबंधाक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, उपाधीक्षक रुपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकिशोर क्षीरसागर यांनी ही कारवाई केली. त्यांना अंमलदार राजेंद्र जोशी, रवींद्र काळे, सोमीनाथ थिटे यांनी सहकार्य केले.

मोटरसायकलसहित चोरटा पकडला

औरंगाबाद – क्रांतीचौक पोलिसांनी गस्तीवर असतांना मोटरसायकल चोर पकडला त्याच्या ताब्यातून चोरीच्या तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या.

शेख अनिस युसुफ शेख(३२) रा. बायजीपुरा असे अटक चोरट्याचे नाव आहे.त्याने गेल्या एक महिन्यात पुंडलिकनगर, वेदांतनगर,बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या अंदाजे १लाख रु.किमतीच्या तीन मोटरसायकल पोलिसांच्या हवाली केल्या.वरील कारवाई पोलिस निरीक्षक डिॅ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विकास खटके यांनी पार पाडली. पुढील तपासासाठी चोरटा वेदांतनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!