AurangabadNewsUpdate : बोलेरो दुभाजकावर आदळून बसला भिडली , भीषण अपघातात ७ ठार

औरंगाबाद : औरंगाबाद – जालना मार्गावर बस आणि बोलेरो जीप च्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार झाले असल्याचे वृत्त आहे. औरंगाबाद-जालना मार्गावर गाढेजळगाव फाट्याजवळ सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या विषयीची सविस्तर माहिती अद्याप हाती आलेली नाही.
या अपघाताविषयी मिळालेली प्राथमिक माहिती , पुणे-कळमनुरी बस जालन्याकडे जात असताना जीप चालकाचे जी[वरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर आद्वि होऊन हि जीप बसवर आदळली दरम्यान बस चालकाने प्रसंगावधान राखत डाव्या बाजूला बस घेतली. या अपघातातात चार जण जागीच ठार झाले तर अन्य तिघा जखमींना उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले आहे. एमएच २१ बीएच ४३३१ असा या बोलेरो जीपचा क्रमांक आहे. सादर गाडी औरंगाबादच्या दिशे येत होती.
अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी लागलीच अपघातस्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. या अपघातामुळे जालना रोडवरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात बोलेरो गाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे.