Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : सीएए बाबत गृहमंत्री अमित शहा यांनी केले मोठे विधान

Spread the love

कोलकाता: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या सीएए अंमलबजावणीबाबत मोठे विधान केले. शहा दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले आहेत. सुधारित नागरिकत्व कायदा हे वास्तव असून तृणमूल काँग्रेस त्याबाबत काहीही करू शकत नाही, असे ते म्हणाले. उल्लेखनीय आहे की , सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या शाहीन बागसह देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. सरकारने ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले आहे, असे बरेच दिवस बोलले जात होते.

पश्चिम बंगालच्या सिलीगुडी जिल्ह्यात बोलताना शाह म्हणाले की, तृणमूल काँग्रेस अफवा पसरवत आहे की, नागरिकत्व कायदा कधीही जमिनीवर येणार नाही. पण मी त्यांना सांगू इच्छितो की कोविड महामारी संपल्यावर आम्ही सीएए लागू करू. ममता दीदींना घुसखोरी हवी आहे, पण सीएए हे वास्तव आहे, त्याची अंमलबजावणी केली जाईल.

शाह म्हणाले, मी आज उत्तर बंगालमध्ये आलो आहे, मला सांगायचे आहे की कोविड महामारी संपताच आम्ही सुधारित नागरिकत्व कायदा लागू करू. दरम्यान यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे कि , “ही त्यांची योजना आहे, ते संसदेत विधेयक का आणत नाहीत, ते 2024 मध्ये पुन्हा सत्तेत येत नाहीत. मला हे सांगायचे आहे. कोणाचाही नागरिकत्वाचा अधिकार कोणी हिरावून घेऊ नये, अशी माझी इच्छा आहे. आमची एकता हीच आमची ताकद आहे. वर्षभरानंतर ते इथे आले आहेत. ते प्रत्येक वेळी येतात आणि अशा फालतू गोष्टी बोलतात.”
सीएए बाबत 2019 च्या उत्तरार्धात आणि 2020 च्या सुरुवातीस मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!