Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : नांदेडकडे शस्त्र घेऊन निघालेल्या दहशतवाद्यांना रस्त्यातच अटक

Spread the love

नवी दिल्ली  : हरियाणाच्या करनाल पोलिसांनी एका मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. पंजाबमध्ये राहणाऱ्या खलिस्तानी दहशतवादाशी आणि आयएसआयशी संबंधित असलेल्या चार संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी शस्त्रे आणि आरडीएक्ससह अटक केली आहे.


दिल्ली, महाराष्ट्रात मोठा घातपात करण्याची त्यांची योजना होती. पोलिसांच्या माहितीनुसार हे दहशतवादी नांदेडकडे निघाले होते. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राज्याबाहेरील लोकांचा राज्यात दंगली घडविण्याचा कट असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली असल्याचे म्हटले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, या चौघांना पहाटे ४ वाजता कर्नालच्या बस्तारा टोलनाक्यावरून अटक करण्यात आली आहे. हे चौघे एका इनोव्हा कारमधून दिल्लीच्या दिशेने जात होते. अटक करण्यात आलेले संशयित दहशतवादी गुरप्रीत, भूपेंद्र अमनदीप आणि परविंदर सिंग हे पंजाबचे रहिवासी आहेत.

पाकिस्तान कनेक्शन

या कारवाईची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की , पाकिस्तानमध्ये राहणारा हरविंदर सिंग याचे हे चार साथीदार आहेत. कर्नाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांबाबत कर्नालचे एसपी म्हणाले की, दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा याने त्यांना आदेश दिले होते. चार संशयित दहशतवाद्यांना तेलंगणा आयईडी पाठवले जाणार होते, असे सांगण्यात येत आहे. त्यांचे लोकेशन पाकिस्तानातून पाठवण्यात आले होते. यापूर्वी या लोकांनी दोन ठिकाणी आयईडीचा पुरवठा केला आहे. त्यांच्याविरुद्ध मधुबन पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास एसीपी उंद्री करणार आहेत.

आरोपी नांदेडला निघाले होते

त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, 31 काडतुसे आणि 3 लोखंडी कंटेनर जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच १ लाख ३० हजार रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. तीन तरुण फिरोजपूरचे रहिवासी आहेत. 1 तरुण लुधियानाचा रहिवासी आहे. मुख्य आरोपीची तुरुंगात आणखी एका तरुणाशी भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे चारही आरोपी दिल्ली मार्गे महाराष्ट्रातील नांदेड येथे जात होते.

या संशियत आरोपींचा पाकिस्तानशी काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. गुप्तचर संस्था आयबीला मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांसह ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. अटकेत असलेल्या संशयित दहशतवाद्यांचा बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याचा संशय आहे.

दरम्यान आतापर्यंत करण्यात आलेल्या चौकशीनुसार, या संशयित दहशतवाद्यांना ड्रोनद्वारे शस्त्र पुरवठा करण्यात आला. पाकिस्तानमधील दहशतवादी हरविंदर सिंह रिंदा याच्यासोबत या दहशतवाद्यांचे संबंध असल्याचे म्हटले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!