Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaNewsUpdate : धक्कादायक : हिंगणीत गावातून भीम जयंतीची मिरवणूक काढल्यांने २४ जणांना अटक

Spread the love

प्रभाकर नांगरे | हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणी गावात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढणाऱ्या रिपब्लिकन युवासेना प्रदेशाध्यक्ष सरपंच किरण घोंगडे यांच्यासहित सहित हिंगणी, टाकळी येथील ३४ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून मिरवणुकीनंतर २७ जणांना अटक केली आहे.

याविषयी अधिक माहिती कि , हिंगणी आंबेडकर प्रेमी जनतेने प्रशासनाकडे रीतसर पाठपुरावा करून दि. २९ एप्रिल रोजी गावातून जयंतीची मिरवणूक काढली होती या मिरवणुकीला वंजारी समाजाचा विरोध होता त्यांनी त्यांच्या वस्तीतून मिरवणूक काढण्यास मज्जाव केला होता, तसा ठराव ग्रामपंचायत ने घेतला होता ही मिरवणूक केवळ मागासवर्गीय वस्ती तूनच काढण्यात यावी असा दबाव पोलीस प्रशासनावर आणला होता परंतु आंबेडकर प्रेमी जनतेने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही गावात जातीवाद होत असल्याचे पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आणून गावातील पारंपारिक प्रभात फेरी व इतर धार्मिक सोहळ्याचा मिरवणूक मार्ग आहे त्या मार्गाने आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढण्यास परवानगी मागितली होती परंतु प्रशासनाच्या वतीने आंबेडकर प्रेमी जनतेची ही मागणी धुडकावून मागास वर्गीय वस्तीतून मिरवणूक काढण्याची परवानगी दिली होती.

गावातून मिरवणूक काढण्यास विरोध , ग्रामपंचायतींचाही ठराव

दरम्यान गावातील पारंपारिक मिरवणूक मार्गावरून आंबेडकर जयंतीची मिरवणूक काढल्या जाऊ नये याबाबत वंजारी समाज शेवटपर्यंत प्रयत्नशील होता त्यासाठी त्यांनी या मिरवणूक मार्गावर ठिकाणी मंडप टाकले होते तेव्हा आंबेडकर प्रेमी जनतेने मिरवणूक मार्गातील अडथळे दूर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्याबाबत आंबेडकरी जनतेने ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्याने हे मंडप शेवटी काढण्यात आले.त्यानंतर पोलिसांनी मिरवणूक मार्गावर बॅरिकेट्स लावल्या होत्या. दुपारी जेव्हा मिरवणूक सुरू झाली तेव्हा आंबेडकर प्रेमी जनतेने जो गावातील पारंपारिक मिरवणुकीचा मार्ग आहे त्या मार्गाने मिरवणूक नेण्याचे ठरविले आणि त्या मार्गाने शेवटी मिरवणूक काढली त्यामुळे पोलीस प्रशासनाने वंजारी समाजाच्या दबावाला बळी पडून त्यांच्या वस्तीतून मिरवणूक का काढली व ग्रामपंचायतीने ठराव घेतले यानुसार केवळ मागास्वर्गीय वस्तीतून व प्रशासनाने ठरवूनदिलेल्या मागासवर्गीय मार्गावरून मिरवणूक का काढली नाही म्हणून आंबेडकर प्रेमी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यात आंबेडकरी चळवळीतील हिंगोली जिल्ह्यातील युवा नेते किरण घोंगडे यांचा आरोपी मध्ये समावेश केल्याने आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

मिरवणूक काढणारांविरुद्ध कारवाई

याबाबत कळमनुरी पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सखाराम सोनुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिता राजकुमार सरतापे, राजकुमार गोविंदा सरतापे, किरण घोंगडे, बबन सखाराम दवणे, पांडुरंग सखाराम कोल्हे, किसन हरिभाऊ खंडागळे, गौतम जगन्नाथ सरतापे, विजय मारूती कोल्हे, लखन यशवंतराव सरतापे, बाळू कबीर खंडागळे, तथागत प्रताप पाईकराव, कौतिका किसन कोल्हे, प्रकाश हनवता हनवते, कमल सखाराम दवणे, पंडित चांदुजी दवणे, रत्नाकर जगन्नाथ सरतापे, वर्षा राजकुमार कोल्हे, राजकुमार सखाराम कोल्हे, वंदना त्र्यंबक खंडागळे, सुबोध बबन सरतापे, अमोल बबन खंदारे, अरविंद यशवंता सरतापे, संदीप सखाराम कोल्हे, प्रल्हाद भीमराव खंदारे, सुवर्णा प्रल्हाद खंदारे, रंजना रमेश दांडेकर, नंदाबाई भीमराव खंदारे, भीमराव निवृत्ती खंदारे, बबन निवृत्ती खंदारे, गयाबाई बबन खंदारे, मनीषा सुधाकर खंदारे, दीपक केरबा खंडागळे, भूषण पाईकराव व इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी २७ जणांना दि. २९ एप्रिल रोजी रात्री ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोयलावार हे अधिक तपास करीत आहेत.

विरोधी लोकांवर गुन्हे दाखल होतील का?

हिंगणी येथील भीम जयंती जयंती प्रकरणी बौद्ध बांधवांच्या वतीने सुद्धा दि. २६ एप्रिल २०२२ रोजी एक तक्रार देण्यात आली आहे. त्यामध्ये हिंगणी ग्रामपंचायतने जयंती न काढण्याबाबत बेकायदेशीर आणि जातीवादी स्वरूपाचा ठराव पारित केला असल्याने ग्रामसेवक, सरपंच, सूचक आणि ठराव घेणार्‍या ग्राम पंचायत सदस्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु याबाबत अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. तर जयंती समारोहानंतर परतणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून वाहनांचे नुकसान करण्यात आले आहे. दगडफेक प्रकरणी सुद्धा २९ एप्रिल २०२२ रोजी हिंगोली पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत पोलीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!