Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MharashtraNewsUpdate : MPSC Result : मुलांमध्ये प्रमोद चौगुले तर मुलींमध्ये रुपाली माने सर्वप्रथम

Spread the love

पुणे  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२० च्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून  सांगलीचा प्रमोद चौगुले हा विद्यार्थी राज्यात पहिला क्रमांक आला आहे. तर मुलींमध्ये रुपाली माने या विद्यार्थीनीने पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे  आयोगाने आज मुलाखती घेतल्यानंतर अवघ्या एक तासात हा निकाल जाहीर केला आहे. त्यामुळे हा निकाल ऐतिहासिक आहे.

दरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यसेवा २०२० ची लांबलेली प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यास आयोगाने प्राधान्य दिले. आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यसेवेच्या मुलाखती संपल्यावर तासाभरात निकाल जाहीर करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली आहे.

राज्यसेवा आयोगाने आज एकूण ५९७ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या गुणवत्ता यादीत सांगलीच्या प्रमोद चौगुले या विद्यार्थ्याला सर्वाधिक ६१२.५० गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.  नितेश नेताजी कदम हा राज्यात दुसरा आला असून त्याला ५९१.२५ गुण मिळाले आहेत. तर मुलींमध्ये पहिल्या आलेल्या रुपाली माने हिला ५८०.२५ गन मिळाले असून ती राज्यात तिसरी आली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाकडून डिसेंबर २०१९ मध्ये १५ संवर्गातील २०० पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एप्रिल २०२०मध्ये परीक्षा घेण्याचे आयोगाचे नियोजन होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा चार वेलोकसेवा ळा पुढे ढकलावी लागली. अखेर मार्च २०२१मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली. पूर्व परीक्षेसाठी २ लाख ६२ हजार ८९१ उमेदवारांनी नोंदणी केली, तर १ लाख ७१ हजार ११६ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. पूर्व परीक्षेचा निकाल सप्टेंबर २०२१मध्ये जाहीर करण्यात आला. ३ हजार २१४ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. त्यापैकी २ हजार ८६३ उमेदवारांनी डिसेंबर २०२१मध्ये मुख्य परीक्षा दिली. त्यातून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या ६१५ उमेदवारांपैकी ५९७ उमेदवारांनी मुलाखत दिली. त्यानंतर १८ ते २९ एप्रिल दरम्यान मुलाखती घेऊन अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

 

गुणवत्ता यादीतील पहिले १० विद्यार्थी आणि त्यांचे गुण पुढील प्रमाणे

1) प्रमोद चौगुले (प्रथम क्रमांक) – ६१२.५० गुण ।  राखीव संवर्ग EWS

2) नितेश नेताजी कदम – ५९१.२५ गुण ।  राखीव संवर्ग EWS

3) रुपाली माने (मुलींमध्ये प्रथम क्रमांक) – ५८०.२५ गुण । ।  राखीव संवर्ग EWS

4) शुभम जाधव – ५७३ गुण ।  राखीव संवर्ग EWS

5) अजिंक्य जाधव – ५६७ गुण ।  राखीव संवर्ग EWS

6) गिरीश पारेकर -५६६.५० गुण ।  राखीव संवर्ग OBC

7) वैभव शिंदे – ५६५.७५ गुण ।  राखीव संवर्ग EWS

8) अमोल परीहर – ५६५.५० गुण  ।  राखीव संवर्ग DT -A

9) महेश हरीशचंद्रे – ५६५ गुण । राखीव संवर्ग OBC

10) ज्ञानेश्वर पाटील – ५६४.५० गुण ।  राखीव संवर्ग EWS

सविस्तर निकालासाठी येथे क्लिक करा आणि निकाल पहा 

https://mpsc.gov.in/downloadFile/english/4898

आपलं सरकार

Click to listen highlighted text!