Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GaneshNaikNewsUpdate : अटकेपासून वाचण्यासाठी आ. गणेश नाईक यांचा ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Spread the love

मुंबई  : लिव्ह इन रिलेशन प्रकरणातून  दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातून होणारी अटक थांबण्यासाठी भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे तर पोलीस त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यासोबत तब्बल २७ वर्षे रिलेशनशिप मध्ये असलेल्या आणि संबंधास नकार दिल्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गणेश नाईक यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांकडून गणेश नाईक यांचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे गणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे नेते गणेश नाईक यांच्यावर एका महिलेने  लिव्ह इन रिलेशनशिपचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. आता ही पीडित महिला समोर आली असून आमची डीएनए चाचणी करावी, कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही, माझ्या मुलाला वडिलांचे नाव मिळावे, अशी मागणी पीडितेने  केली आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे आमदार गणेश नाईक चांगलेच अडचणीत सापडले आहे. ज्या पीडितेनं नाईकांवर आरोप केला. त्या महिलेने  आता समोर येऊन आपली भूमिका मांडली.

आमची डीएनए टेस्ट करावी …

पीडित महिलेने म्हटले आहे कि , ‘माझ्यावर अत्याचार झालाय, माझं शोषण झालंय, मला टॉर्चर केलं गेलंय अशी उद्विग्न प्रतिक्रिया गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने व्यक्त केली आहे. डीएनए टेस्ट केल्याशिवाय याचा निर्णय लागू शकत नाही. त्यामुळे आमची डीएनए टेस्ट करावी. जिथे जिथे मला मदत भेटेल तिथे तिथे मी जाणार असून मला कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नसल्याचेही पीडित महिलेनं स्पष्ट केलं. ‘आमच्यावर सुरुवातीपासून भेदभाव होत आलाय, कुठेही आमचा स्वीकार केला गेला नाही, आम्हाला लपवून ठेवलं गेलं. नाईकांची माझ्या मुला विषयी कोणतीही प्रेमाची भावना देखील नाही. अशी प्रतिक्रिया देखील पीडित महिलेने व्यक्त केलीय. यासोबतच मला पैश्याचा मोह नसून फक्त मुलाला वडिलांचे नाव मिळावं हीच अपेक्षा असल्याचे या महिलेनं स्पष्ट केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!