Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले विजेच्या टंचाईचे मुख्य कारण …

Spread the love

नागपूर : राज्यामध्ये निर्माण झालेले संकट कुणाच्याही भांडणामुळे निर्माण झालेले नाही, केंद्र सरकारने बँकांना पत्र लिहून महाडिस्कोला कर्ज देऊ नका पत्र दिले आहे. त्यामुळे ग्रामविकास खात्याने ८ हजार कोटी रुपये दिले नाही, परिणामी आमची थोडी कुचंबणा झाली आहे. त्यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्रवजा  तक्रार दिली आहे, जर आम्हाला हे पैसे मिळाले तर वीज घेणे शक्य होईल असे सांगत असताना  १९ तारखेपर्यंत आम्ही नियोजन केलेले आहे सर्व परिस्थिती सुरळीत होईल अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.


ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील लोडशेडिंगबद्दल माहिती दिली. यावेळी नितीन राऊत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ‘कोल इंडिया लिमिटेड ही कंपनी देशातल्या सर्व वीज कंपन्यांना कोळसा पुरवते त्यांच्या व्यवस्थापनामुळे समस्या निर्माण झाली आहे. कोळशाचं प्रमाण, त्याची जी परिस्थिती असते त्यानुसार किती प्रमाण असते त्यानुसार दररोज कोळसा दिला जातो. या स्थितीमध्ये फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाची परिस्थिती आहे जर देशाची परिस्थिती नाही तर केंद्र मंत्र्यांनी सर्व राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांसोबत चर्चा का केली, अशी माहिती राऊत यांनी दिली.

हे राज्य आपलेही आहे …दानवीनच्या टीकेला उत्तर

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले कि , ‘तुम्हाला कोळसा खरेदी करायचा असेल तर इम्पोर्टेड कोळसा खरेदी करावा, असे  सांगितले. याचा अर्थ देशांमध्ये आणि राज्यांमध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे. दानवेंनी आरोप करण्यापेक्षा चार बोट आपल्याकडे आहे, हे विसरू नये. आरोप करणे खूप सोपे आहे, मात्र राज्य आमचे  असेल तर विरोधकांचेही आहे, त्यामुळे सकारात्मक विचार करावा आणि यामध्ये चर्चा करून विचारविनिमय करून हा प्रश्न कसा सुटेल यासाठी प्रयत्न करावा. दानवे साहेबांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आम्हाला सहकार्य करावे, त्यांच्याकडे रेल्वे खाते आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःला तपासून घ्यावे, असा टोलाही  राऊत यांनी दानवेंना लगावला.

नागरिकांना वीज बिल भरण्याचे आवाहन

राऊत पुढे म्हणाले कि , कोरोनानंतर विजेची मागणी वाढली आहे, मात्र राज्य सरकारने पूर्णपणे व्यवस्थापन केले आहे, अधिकारी आमचे रोज नजर ठेवून आहेत, बैठका घेत आहेत. ही वेळ या देशात दुसऱ्यांदा आलेला आहे, राज्य सरकारची या अजिबात चूक नाही, आम्हाला आता कोळसा वापरून पावसासाठी सुद्धा साठा करून ठेवायचा आहे. ‘जे वीजचोर्‍या करतात, वीज बिल भरत नाही, त्यांचे  काय करायचे , फुकटात मिळत नाही, पैसा लागतो. माझी राज्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी वीज त्यांनी वीज बिल प्रामाणिकपणे भरावे, त्यांचे उपकार सरकार विसरणार नाही, सरकारी निमसरकारी खात्यात जे नियम जे निकष राज्यातील जनतेला आहे, तेच नियम तेच निकष सर्व खात्यांना लागू आहे, असेही राऊत म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!