Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

DrAmbedkarJayantiSpecialUpdate : भीम जयंतीची जगभरात धूम , सोलापुरात १ रुपये लिटर पेट्रोल , राष्ट्रपती , पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांचे बाबासाहेबांना अभिवादन

Spread the love

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे मोठ्या प्रमाणात साजरी न झालेली  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वि जयंती यंदा जगभर मोठ्या धूम धडाक्यात आणि जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आज दिवसभर ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला आणि पुतळ्याला अभिवादन करण्यात येत आहे. दरम्यान कोलंबिया विद्यापीठातही बाबासाहेबांची जयंती साजरी केली जात आहे. 

गेल्या ८ दिवसांपासून जयंतीची तयारी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. काल मध्यरात्री १२ वाजता सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करून जयंती उत्सवाला सुरुवात करण्यात आली. या निमित्ताने महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे जयंतीदिनीही  राज्य शासनाच्या वतीने चैत्यभूमी येथे हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येत असल्याची माहिती  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

राज्यातील सर्वात विशेष बातमी म्हणजे देशभरात पेट्रोलचा भडका उडालेला असताना सोलापुरात डॉ. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त आज सोलापुरातील डफरीन चौकातील पेट्रोल पंपावर १ रुपयात एक लिटर पेट्रोल देण्यात येत आहे. मध्यवर्ती उत्सव आणि विश्वस्त समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापुरातील मध्यवर्ती उत्सव समितीच्या वतीने १४ एप्रिल ते १७ एप्रिल असा जयंती उत्सव सप्ताह जाहीर करण्यात येत आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिवादन 

पंप्रधान नरेन्द्र मोदी यांचे अभिवादन

चैत्यभूमीवर अभिवादन

मुंबईच्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबई महापालिकेने जय्यत तयारी केली आहे.  येथे येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी पाण्याची सुविधा, रुग्णवाहिका आदींची सोय पालिकेने केली आहे. चैत्यभूमीच्या परिसरात फुलांनी सजावट करण्यात आली आहे, अशी माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. चैत्यभूमीवर येणाऱ्या नागरिकांसाठी दादर चौपाटीवर नव्याने उभारलेले माता रमाबाई आंबेडकर डेक हे नवे आकर्षण असेल. त्या भागातही पालिकेने सुशोभिकरण केले आहे.

औरंगाबादेत जल्लोष

डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादमध्ये चौका चौकात आणि वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सजवत करण्यात आली असून रात्री निघणाऱ्या जयंतीच्या मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी मिरवणुकीच्या मार्गावर विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने स्टेज उभे करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बाबासाहेबांना अभिवादन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी सोबत आदित्य ठाकरेही होते. सशक्त राज्यघटनेच्या पाठबळावरच राज्याची विकासाची वाटचाल सुरु असे यावेळी  मुख्यमंत्री म्हणाले.

शरद पवार यांचे अभिवादन

सर्व शाळांमध्ये जयंती साजरी करण्याचे आवाहन

राहुल गांधी यांचे अभिवादन

नांदेड येथे चिमुकल्यांकडून अठरा तास अभ्यास करून अनोख्या पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन

नागपूर शहरात  दिक्षाभूमीवर सकाळपासून अनुयायांची गर्दी; दोन वर्षानंतर साजरी होणार जयंती

सिंधुदुर्ग येथे  सागरी किनारी साकारले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वाळूशिल्प

मुंबईत  १३१ किलोंचा केक कापून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं

पुणे शहरात १६६ ठिकाणी निघणार मिरवणुका; पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त

नागपूर शहरात आंबेडकर जयंतीनिमित्त चारशे रॅली व शोभायात्रा निघणार

थोडक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जन्म : १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे.

बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. तर पत्नीचे नाव रमाबाई आणि सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर

मध्य प्रदेशानंतर दापोली, सातारा , मुंबई येथे त्यांचे वास्तव्य होते. त्यांचे शिक्षण मुंबई आणि विदेशात झाले.

बाबासाहेबांची जयंती जगभर साजरी केली जाते. या दिवशी देशात सर्वत्र सार्वजनिक सुटी दिली जाते.

पहिली भीम जयंती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. रणपिसे हे आंबेडकरांचे अनुयायी होते. त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा सुरू केली आणि भीम जयंतीचे औचित्य साधत बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून रथातून, उंटावरून अनेक मिरवणुका काढल्या होत्या.

देशातील पहिली बुद्धजयंती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेसाठी मोठा संघर्ष केला. सर्व मानव समान आहेत हि शिकावं देशात रुजविण्यासाठी त्यांनी अनेक लढे दिले परंतु सनातनी , कर्मठ हिंदू धर्मातील अमानुष विषमतेला मूठमाती देऊन त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात  हिंदू धर्म त्याग करीत आपल्या लाखो अनुयायांसह नागपूर येथे  बौद्ध धर्माचा स्वीकार केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली. मार्च १९५९ च्या एका अहवालानुसार देशात १.५ ते २ कोटी अस्पृश्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. या घटनेची जागतिक इतिहासात नोंद झाली तर या घटनेने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर जगात ऐतिहासिक होते. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले.

जयंती जल्लोषात साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे होऊ न शकलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा दणक्यात आणि उत्साहात, शांततेत पार पाडण्याचे आवाहन राज्याचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे . या पार्श्वभूमीवर त्यांनी मंगळवारीच सह्याद्री अतिथी ग्रहावर बैठक घेऊन योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. गेली दोन वर्षे डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्सव आणि पुण्यतिथीनिमित्त अभिवादन अशा दोन्हीही कार्यक्रमात आपण करोना निर्बंधांमुळे अतिशय संयम पाळला आणि नियमांचे काटेकोर पालन केले, ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. आता करोनाचे सावट कमी झाले आहे आणि या महामानवाची जयंती आपणा सर्वांना उत्साहाने साजरी करायची आहे. महानगरपालिका आणि पोलिस यांनी नेहमीप्रमाणे संपूर्ण नियोजन आणि तयारी केली आहे. राज्यभरात जयंती उत्साहाने तसेच आरोग्याचे नियम पाळून साजरी करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे ठाकरे यांनी बैठकीत सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!