Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : पडेगावात घरफोडी ५ लाखांचा लंपास मुद्देमाल जप्त, एक अटक एक ताब्यात

Spread the love

औरंगाबाद :  पडेगावातील अंबरशाळेसमोर असलेल्या बंद घरात काल रात्री (२मार्च) घुसून ४ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाल्या नंतर पोलिसांनी दोन संशयित ताब्यात घेतले. यातील मुख्य आरोपीला अटक  केली आहे तर दुसरा अल्पवयीन आरोपी १५ वर्षांचा आहे . त्याच्या कडून चोरी गेलेला पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याने तो बायजीपुऱ्यातील  नातेवाइका कडे ठेवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे . त्यांच्याकडून आणखी एक घरफोडी उघडकीस येण्याची दाट शक्यता वरिष्ठ पोलीस सूत्रांनी आरोपींपैकी  एका अल्पवयीन असून एक रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. अब्दुल महमूद लतीफ (२२) रा. कासनबारी दर्गा असे अटक आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणातील मोहम्मद अजहरखान पिता बाबरखान (३१) असे फिर्यादीचे नाव आहे. ते शहरातील नातेवाईकांन्ना भेटण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. चोरटयांनी ३७ हजार रु रोख व ४ लाख १० हजारांचे दागिने पळवले. ज्यामध्ये दोन टोळ्यांचा नेकलेस , डीड टोळ्यांची पोत , अर्धाकिलो चांदी , घड्याळे असा ऐवज आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्या नंतर पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी पीएसआय डाके यांना तपासाची दिशा दाखवताच डाके यांनी संशियताना ताब्यात घेत चौकशी सुरु करताच तपास योग्य दिशेने होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.  पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता , पो लस उपायुक्त उज्वला वानकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई पार पडली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!