Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : चौघे अटकेत २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

औरंगाबाद – सिटीचौक पोलिसांनी तलवारीने धुडगुस घालून दहशत माजवणार्‍या तिघांसह आणखी एका चोरट्याला  बेड्या ठोकल्या. तर गुन्हेशाखेने २लाख ३५हजारांचा मुद्देमाल जप्त करंत तीन गुन्हे उघडकीस आणले व चोरटा जेरबंद केला. वंश उर्फ शंकर वडमारे (२९) रा.कैलासनगर गल्ली नंबर ५ असे गुन्हेशाखेने अटक केलेल्या आरोपीचे वर्णन आहे.


२५ फेब्रुवारी रोजी विष्णूनगर भागात वडमारेने सोन्याचे गंठण महिलेच्या गळ्यातून हिसकावून पळ काढला. मंगळसूत्र चोर्‍या करतांना तो चोरीची मोटरसायकल वापरत असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे.तसेच वडमारेने मोटरसायकल चोरीचा गुन्हा सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात दाखल आहे. तर जवाहरनगर पोलिस ठाण्यात वडमारे विरोधात रिक्षा चोरी आणि मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल आहेत.तर सिटीचौक पोलिसांनी २४फेब्रुवारी रोजी चंपाचौक परिसरात तलवार घेऊन धुडगुस घालणार्‍या रेकाॅर्डवरच्या एका सहित दोन गुन्हेगारांना अटक केली. शेख अश्पाक शेख इसाक(२९) शेख मुश्ताक शेख इसाक(२५) शहारुख रहेमतुल्लाखान(२४) तिघेही रा.शहाबाजार अशी अटक आरोपींची नावे आहेत.

वरील दोन्ही कारवाया पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता, पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, उज्वला वानकर, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल ढुमे, अशोक थोरात, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, अशोक गिरी, एपीआय मनोज शिंदे,मोहसिन सय्यद , पोलिस कर्मचारी प्राजक्ता वाघमारे, चंद्रकांत गवळी यांनी पार पाडली.

पोलिस स्नुषेचा विहिरीत मृतदेह

औरंगाबाद – छावणी पोलिस ठाण्यात पोलिस हेडकाॅन्स्टेबलच्या सुनेचा मृतदेह त्यांच्या शेतातील विहरीत संध्याकाळी ५च्या सुमारास आढळला.या प्रकरणी वाळुज पोलिसठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. प्रांजली अक्षय शिंदे(२३) रा.हर्सूली औरंगपुर गुरुधानोरा परिसर प्रांजली सकाळी ११.३०वाजेपासुन घरातून बेपत्ता होती.शिंदे कुटुंब सध्या शेतामधे वास्तव्यास आहे. संध्याकाळी ५वा. शेतातील विहीरीत प्रांजलीचा मृतदेह विहीरीच्या तळाशी आढळून आला.त्यानंतर वाळूज पोलिसांना घटनास्थळी बोलावले.पोलिसांनी अग्निशाममक दलाला मृतदेह बाहेर काढण्यासाठी बोलावले.पण त्यापूर्वी शिवारातील एका नागरिकाने बाजविहीरीत सोडून मृतदेह बाहेर काढला.छावणी पोलिस ठाण्यातील हेडकाॅन्स्टेबल तात्याराव खंडेराव शिंदे यांची ती सख्खी सुन आहे.त्यांचा मुलगा अक्षय हा शेती करतो.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली वाळुज पोलिस करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!