Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RussiaUkraineWarUpdate : हजारो भारतीय विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला , मूलभूत सुविधांचीही आबाळ !!

Spread the love

कीव : भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आपल्या देशात पार्ट आणण्याची मोहीम सुरु केली असली तरी अद्याप सुमारे १६ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले असल्याचे वृत्त असून यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा समावेश आहे. भारताने शनिवारी युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी केलेल्या कारवाईअंतर्गत ए आय १९४४ च्या पहिल्या विमानाने २१९ लोकांना बुखारेस्टहून मुंबईत आणलेअसून युक्रेनमध्ये अडकलेल्या २५० भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे दुसरे विमान रविवारी पहाटे रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून दिल्ली विमानतळावर पोहोचले. दरम्यान, ऑपरेशन गंगा अंतर्गत तिसरे विमान बुडापेस्ट (हंगेरी) येथून २४० भारतीय नागरिकांना घेऊन दिल्लीला रवाना झाले आहे.


उपलब्ध माहितीनुसार युक्रेनच्या पोलंड आणि हंगेरीच्या सीमेवर शेकडो भारतीय अजूनही अडकले आहेत. एका भारतीय विद्यार्थ्याने सांगितले की, येथील तापमान – ७ अंशांच्या जवळ असून काय करावंवे कळेनासे झाले आहे. विशेष म्हणजे युक्रेनमधील अनेक भारतीयांना युद्धादरम्यान निवारा, अन्न आणि पैशाची कोणतीही सुविधा नाही. त्यांचे मोबाईलही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

सीमा ओलांडण्यासाठी विद्यार्थ्यांकडून लाच मागितल्याच्या तक्रारी

दरम्यान आणखी एका वृत्तानुसार युक्रेनचे गार्ड्स भारतीयांना चेक पॉईंट पार करु देत नाहीत. सीमा ओलांडण्यासाठी गार्ड्सकडून विद्यार्थ्यांकडून लाच मागितल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. शुभम नावाच्या विद्यार्थ्याने म्हटले आहे की, आम्ही सीमेवर अडकलो आहोत. आम्हाला येथे व्हिडिओ बनवण्यास मनाई आहे. आणखी एका विद्यार्थ्याने सांगितले की, दूतावासाने जारी केलेल्या सल्ल्यानुसार आम्ही सर्वजण पोलंडच्या सीमेवर पोहोचलो आहोत. इथे आम्हाला थांबवले आहे. आता आम्ही काय करावे समजत नाही. दरम्यान युक्रेनमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, जे भारतीय माहिती न देता सीमा चेक पोस्टवर पोहोचले आहे त्यांना बाहेर काढणे कठीण जात आहे. पश्चिम युक्रेनमधील शहरांमध्ये राहणारे लोक तुलनेनं सुरक्षित वातावरणात राहतात आणि त्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत.

एअर इंडियाच्या विशेष विमानाने विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या केबिन क्रू प्रभारी रजनी पॉल म्हणाल्या, भारतीयांना त्यांच्या घरी परत नेण्याच्या या ऑपरेशनचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे. काही विद्यार्थी सामान घेऊन ९-१० किमी चालत पिकअप पॉइंटवर पोहोचले.” युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी २४ फेब्रुवारीच्या सकाळी प्रवासी विमानांच्या ऑपरेशनसाठी त्यांच्या देशाची हवाई हद्द बंद केली, त्यामुळे भारतीयांना घरी आणण्यासाठी बुखारेस्ट आणि बुडापेस्ट येथून ही विमाने  चालवली जात आहेत. अधिकार्‍यांनी सांगितले की, युक्रेन-रोमानिया आणि युक्रेन-हंगेरी सीमेवर रस्त्याने पोहोचलेल्या भारतीय नागरिकांना भारत सरकारच्या अधिकार्‍यांच्या मदतीने अनुक्रमे बुखारेस्ट आणि बुडापेस्ट येथे रस्त्यानं नेण्यात आले . जेणेकरून त्यांना एअर इंडियाच्या विमानाने भारतात परत आणता येईल. युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी सरकार कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!