Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PoliticalNewsUpdate : लखीमपूरच्या घटनेवर अखेर पंतप्रधान अखेर बोलले म्हणतात , काय बोलले ते तुम्हीच पहा… !!

Spread the love

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेवर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असल्याची मोठी बातमी आली आहे. हि बातमी म्हणजे काय ? तर भाजप मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना कारखाली चिरडले होते, या घटनेवर सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिले त्याला योगी सरकारने पूर्ण सहमती दर्शवली आहे’.


या प्रकरणावर पंतप्रधान आधी बोलले नसल्याने त्यांच्यावर मोठी टीका होत होती तरीही पंतप्रधान बोलले नाही . दरम्यानच्या काळातही देशात अशा अनेक घटना घडल्या ज्यावर त्यांनी बोलावे असे लोकांना वाटत होते त्यावरही पंतप्रधान बोलले नाही परंतु आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआयए वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत पंतप्रधान मोदींना लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना कारखाली चिरडून ठार मारणाऱ्या घटनेवर भाष्य केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण निर्णय

या घटनेवर त्यांनी थेट भाष्य केले नसले तरी त्यांनी म्हटले आहे कि , ‘लखीमपूर घटनेवर सर्वोच्च न्यायालयाने जी समिती तयार करण्यास सांगितले होते, त्यावर राज्य सरकारने सहमती दिली. ज्या न्यायधीशाच्या नेतृत्वामध्ये चौकशी करण्याची मागणी केली, त्याला योगी सरकारने सहमती दर्शवली, राज्य सरकारने पारदर्शकतेने काम करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण निर्णय घेतले आहे. दरम्यान देशात एक वेगळाच प्रकार सुरू आहे. विरोधक म्हणताय आम्ही हे करू, ते करणार, पण ५० वर्षानंतरही त्यांना विचारले तर ते काम आम्हीच केले होते असा दावा करायला ते विसरणार नाही, अशी लोक खूप मिळतील, असे म्हणत मोदींनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये अनेक योजना या सपानेच आणल्या होत्या, असा दावा यादव यांनी केला होता, त्यावर मोदींनी उत्तर दिले.

काँग्रेसवर पुन्हा टीका

लोकसभेत आणि राज्यसभेत पंतप्रधान म्हणून बोलताना त्यांनी काँग्रेसवर जी टीका केली त्यावरूनही मोदींवर टीका होत आहे याचा खुलासाही त्यांनी आपल्या या मुलाखतीत केला. ‘घराणेशाही असलेले पक्ष हे लोकशाहीला घातक आहे. जेव्हा एखादे कुटुंब हे पक्षाची सर्वोत्तम गरज बनते तेव्हा परिवार वाचवा आणि पक्ष वाचला नाही तरी चालेल, देश वाचला नाहीतरी चालेल. असे जेव्हा असेल तेव्हा देशाचे जास्त नुकसान होते, असे म्हणत मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच, ‘मी कधीच कुणाच्या वडिलांबद्दल, आई आणि आजोबांबद्दल बोललो नाही. देशाच्या माजी पंतप्रधानांनी काय म्हटले होते , तेच समोर मांडले . त्यावेळी पंतप्रधानांचे विचार काय होते, त्यावेळी काय परिस्थिती होती आणि त्यांचे काय विचार होते, हे मी सांगितले ‘ असे म्हणत आपण नेहरू यांच्यावर टीका केली नसल्याचा खुलासा मोदींनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!