Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshElectionUpdate : पहिल्या टप्प्यात यूपीच्या 58 जागांवर सुरु आहे मतदान…

Spread the love

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या आज म्हणजेच गुरुवारी (10 फेब्रुवारी) 11 जिल्ह्यांतील एकूण 58 विधानसभा जागांवर मतदान होत आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 35 टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे. शामली जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी ४१.१६ टक्के, तर सर्वात कमी गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात सरासरी ३०.५३ टक्के मतदान झाले आहे. गाझियाबादमध्येही मतदानाचा वेग तुलनेने कमी आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत केवळ 33.40 टक्के मतदान झाले आहे.


दरम्यान, उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी ते म्हणाले की, यूपीच्या जनतेने ठरवले आहे की राज्य दंगलमुक्त ठेवण्यासाठी भाजप सरकार स्थापन करेल.

मुझफ्फरनगर, हापूर, मथुरा, आग्रा येथील अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच लोकांची गर्दी दिसून येत आहे. मतदान केंद्रावर लोक रांगेत आपली पाळी येण्याची वाट पाहत होते. हा भाग गेल्या वर्षी शेतकरी चळवळीचा बालेकिल्ला राहिला आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशात मतदान होत आहे. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली, ती सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने शांततेत निवडणुकीसाठी सर्व तयारी पूर्ण करत मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. या टप्प्यात विधानसभेच्या ५८ जागांसाठी ६२३ उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी ७३ महिला उमेदवार आहेत.

या जिल्ह्यांमध्ये मतदान

पहिल्या टप्प्यात शामली, हापूर, गौतम बुद्ध नगर, मुझफ्फरनगर, मेरठ, बागपत, गाझियाबाद, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा जिल्ह्यांतील विधानसभा जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात 2.28 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावू शकतील, ज्यात 1.24 कोटी पुरुष, 1.04 कोटी महिला आणि 1448 ट्रान्सजेंडर मतदारांचा समावेश आहे.

या दिग्गजांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारचे मंत्री श्रीकांत शर्मा, सुरेश राणा, संदीप सिंग, कपिल देव अग्रवाल, अतुल गर्ग आणि चौधरी लक्ष्मी नारायण यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे.

रेसलर द ग्रेट खली व्यावसायिक कुस्तीपटू दलीप सिंग राणा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!