Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : अमित शहा यांच्या विनंतीला ओवैसींचा पुन्हा नकार

Spread the love

नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन म्हणजेच ‘एमआयएम’ पक्षाचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज (सोमवार) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून झेड प्लस सिक्युरीटी घेण्याची केली गेलेली विनंती पुन्हा एकदा नाकारली असून मी एक मुक्त पक्षी आहे, मुक्तपणे जगायचे आहे असे सांगितले आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशमध्ये ओवेसी यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात आज दुपारी राज्यसभेमध्ये निवेदन करताना केंद्राकडून देण्यात आलेली झेड दर्जाच्या सुरक्षेचा ओवसींनी स्वीकार करावा, अशी विनंती केली होती. परंतु, गृहमंत्री अमित शाह यांच्या विनंतीनंतरही, ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास पुनश्च नकार दिला आहे.

अमित शहा यांच्या विनंतीला उत्तर देताना अमित शहा म्हणाले कि , “आज संसदेत, गृहमंत्री अमित शाह यांनी मला झेड दर्जाची सुरक्षा घेण्यास सांगितले. मला त्यांना सांगायचे आहे की, सीएए विरोधातील आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या २२ जणांपेक्षा माझ्या आयुष्याचे मूल्य जास्त नाही. मला माझ्या सभोवताली शस्त्र हाती घेतलेली लोक आवडत नाहीत. मी एक मुक्त पक्षी आहे, मुक्तपणे जगायचे आहे.”

दरम्यान आपल्यावरील हल्ल्याबाबत बोलताना खा. ओवेसी  यांनी म्हटले होते कि , “१९९४ मध्ये मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत मी कोणतीही सुरक्षा घेतली नाही. मला हे आवडतही नाही. माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. मी भविष्यातही सुरक्षा घेणार नाही. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन”.

खा. असदुद्दीन ओवेसी  उत्तर प्रदेशातून  हापूर येथून दिल्लीला जाताना हापूर-गाझियाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अज्ञान व्यक्तींनी यांच्या वाहनावर गोळीबार केला होता.  याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर ओवेसी यांना सीआरपीएफची झेड श्रेणीची सुरक्षा देखील तत्काळ प्रदान करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र, ओवेसींनी ही सुरक्षा तेव्हा देखील नाकारली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!