Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : सिनेअभिनेते रमेश देव यांचे निधन

Spread the love

मुंबई : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले असल्याचे वृत्त आहे. ते ९६ वर्षांचे होते. नुकतीच त्यांनी ३० जानेवारी रोजी आपल्या वयाची ९६ वर्षे पूर्ण केली होती. मराठी चित्रपटांबरोबरच रमेश देव यांनी हिंदीतही आपल्या अभिनयातून ठसा उमटवला होता. त्यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले होते. हिंदीतील त्यांचा आनंद हा सिनेमा अजरामर आहे. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.


रमेश देव यांनी आतापर्यंत २८० पेक्षा जास्त चित्रपटांत काम केलं आहे. रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीत आपला काळ गाजवला. रमेश देव आणि त्यांच्या पत्नी  सीमा देव यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केले. या दोघांचे अनेक चित्रपट चांगलेच गाजले. १९६२ मध्ये त्यांनी वरदक्षिणा या चित्रपटात सोबत काम केल्यानंतर त्यांनी त्यांनी त्याच वर्षी लग्न केले होते.

रमेश देव यांना २०१३ साली  ११ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले  होते . पाटलाचं पोर, सुवासिनी, झेप, अपराध, सर्जा, या सुखांनो या, आनंद, कसौटी, फटाकडी, जय शिवशंकर, तीन बहुरानियाँ असे त्यांचे अनेक गाजलेले सिनेमे प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. याशिवाय अनेक नाटके आणि मालिकांमधून देखील त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. २००६ साली आलेल्या निवडुंग या मालिकेतील त्यांची भूमिका विशेष लोकप्रिय ठरली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!