Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

InforamaitonUpdate : आरोग्य : ‘सेहत ईझी’ : आरोग्यक्षेत्रात संजीवनी देणाऱ्या अॅपचे लोकार्पण …

Spread the love

औरंगाबाद :  एआयसी बामू फाउंडेशन अंतर्गत स्टार्टअप इन्क्यूबी असणाऱ्या सेहत इझी अॅपचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या हस्ते अॅप-लाँच करण्यात आले. आरोग्य क्षेत्रातील हॉस्पिटल, मेडिकल, लॅब आदी सुविधा सवलतीच्या दरात मिळाव्यात यासाठी हे अॅप तयार करण्यात आले असून आजपासून याचा लाभ घेता येईल याबद्दल सेहत इझी अँपचे संचालक सुरेश सोरमारे यांनी माहिती दिली.


कोरोना काळात सामाजिक भावनेतून गरजू रुग्णांना मदत करताना येणाऱ्या अडचणी, सुरेश सोरमारे यांनी अनुभवल्या व त्यावर तोडगा म्हणून तपासणीसाठी डॉक्टरांची ऑनलाइन अपॉइंटमेंट, मेडिकलमधून घरपोच औषधे, पॅथॉलॉजीची घरपोच सेवा देता येईल अशी संकल्पना सुचली. यावर आपले मित्र रवींद्र पाईकराव, कृष्णा जाधव, सदस्य सुमित जैस्वाल यांच्याशी चर्चा करून व एआयसी बामू फाउंडेशच्या सहकार्याने अँप तयार केले असल्याचे सांगण्यात आले. जागतिक स्टार्टअप स्पर्धेत सेहत इझी अॅपच्या संकल्पनेला युरोपियन युनियनतर्फे स्टार्टअप स्पर्धेत विशेष पुरस्कारसुद्धा मिळाला आहे.

या अॅपच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातील हॉस्पिटल आणि तज्ञ डॉक्टर, मेडिकल, लॅबची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. हॉस्पिटल मधील सुविधावर १५ ते २० टक्के सुट मिळेल त्याच बरोबर रुग्णांची वेळ वाचावा व कोरोना काळात जनसंपर्क टाळून आपल्याला घरपोच रक्त तपासणी, औषधी, आपत्कालिन मोफत तज्ञ डॉक्टराचा सल्ला तसेच वृद्ध रुग्णांना घरपोच नर्सिंग सुविधा मिळू शकेल. वरील सुविधासह आर्थिक सवलत मिळावी यासाठी अँपवर ऍड केलेल्या सगळ्या हॉस्पिटल व इतर क्षेत्राला अँपवरुन बुकींग किंवा सेवा घेतल्यास १० टक्यापासून तर ५०%पर्यन्त फिसमधे सवलत मिळू शकेल.

ग्रामीण भागापर्यंत या सुविधा पोहचवा : कुलगुरू डॉ. प्रमोद येवले

कोरोना काळात सेहत इझी टीमने केलेले कार्य प्रशंसनीय आहे. रुग्णांना अँपच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील विविध सुविधा पोहचण्यासोबत आर्थिक सवलत मिळणे ही रुग्णासाठी व्यासपीठाच्या माध्यमातून दिलासा देणारी आहे. आज सुरवात असली तरी आपले कार्यक्षेत्र वाढावा आणी भारतभर पोहचावे ही सेहत इझी टीमला सदिच्छा.

यावेळी शुभहस्ते डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू बामु विद्यापीठ, प्रमुख अतिथी डॉ. सचिन देशमुख, व्यवस्थापकीय संचालक आय आय ल बामु विद्यापीठ, अमित रंजन,व्यवस्थापकीय संचालक, ए या सी बामु फौंडेशन, डॉ गजानन देशमुख,व्यवस्थापकीय संचालक स्वर्णिम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, किशोर शितोळे, अध्यक्ष देवगिरी बँक,बामु विद्यापीठच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य, प्रसाद कोकीळ संचालक, संजय टेक्नोप्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड, डॉ वीरेंद्र जैस्वाल व्यवस्थापकीय संचालक एम्स हॉस्पिटल आणि ट्रॉमा सेंटर, डॉ.श्रीकांत ओव्हार डिटेक्ट डायग्नोस्टिक व्यवस्थापकीय संचालक, विष्णू देविदास सपकाळ, राज मेडिकल
आदींची उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!