AurangabadNewsUpdate : नामांतर दिनी घरातूनच करा अभिवादन , आंबेडकरवादी नेते आणि पोलिसांचे आवाहन

औरंगाबाद : डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर दिनी कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर विद्यापीठ प्रवेश द्वाराजवळ अभिवादनासाठी गर्दी न करता घरातूनच अभिवादन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला . १४ जानेवारी नामांतर दिनाच्या बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील गेस्ट हाऊस येथे उज्वला वनकर , पोलीस उपायुक्त परिमंडळ १ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सहायक पोलिस आयुक्त शहर विभाग तसेच पो. नि. छावणी यांच्यासह शहरातील विविध आंबेडकरवादी संघटना आणि पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ उज्वला वनकर यांनी १४ जानेवारी नामांतर वर्धापन दिन हा महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या कोविड-१९ च्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना प्रमाणे आपापले घरी राहूनच अभिवादन करणे बाबत मार्गदर्शन केले. याला उपस्थित कार्यकर्त्यांनी संमती दिली तसेच कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीला माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे, दिनकर ओंकार, संजय जगताप, डॉ. संदीप जाधव, शांतीलाल गायकवाड, विजय वाघूळ, आनंद कस्तुरे, नागराज गायकवाड, प्रल्हाद गवळी, प्रभाकर मगरे, देविदास आढाव, किशोर थोरात, गौतम खरात, राजू आमराव, सचिन निकम, अमोल खरात, दीक्षा पवार, जयश्री शिर्के , अतुल कांबळे आदींची उपस्थिती होती.