ITInformationUpdate : ‘आयकर रिटर्न’ भरणे वेळेवर शक्य झाले नसेल तर काळजी करू नका….
नवी दिल्ली : तुमचे आयकर रिटर्न भरणे वेळे झाले नसेल तर काळजी करू नका. कारण केंद्र सरकारने आयकर रिटर्न भरण्याची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवली आहे.
अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कोरोनाच्या परिस्थितीमुळे करदात्यांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन ही तारीख वाढवण्यात आली आहे. अधिसूचनेत असेही म्हटले आहे की, प्राप्तिकर कायदा 1961 च्या तरतुदींनुसार विविध लेखापरीक्षण अहवाल ई-फायलिंग करताना येणाऱ्या समस्यांमुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे करदाते आता 15 मार्च 2022 पर्यंत आयटीआर दाखल करू शकतील.
दरम्यान गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटी, सरकारने सांगितले होते की आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही आणि त्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी रिटर्न भरणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले होते. सरकारच्या या निर्णयामुळे वेळेत आयकर रिटर्न भरू न शकलेल्या आयकर दात्यांना दिलासा मिळाला आहे.