CoroanaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 349 नवे कोरोनाबाधित, 1426 सक्रिय रुग्ण

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 64 जणांना (मनपा 58, ग्रामीण 06) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 448 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 349 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 51 हजार 532 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 658 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 1426 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (285)
घाटी परिसर 2, बन्सीलाल नगर 2, सिंधी कॉलनी 1, चेतना नगर 1,कांचनवाडी 1, पैठण रोड 3, औरंगपूरा 1, उस्मानपूरा 1, भावसिंगपूरा 1, पडेगाव 3, ज्योती नगर 1, प्रताप नगर 1, एन-3 येथे 1, राम नगर 1, विमानतळ परिसर 1, कंधारकर हॉस्पीटल परिसर 1, सहेदा कॉलनी 1, नंदनवन कॉलनी 1, गौतम नगर 1, शहानुरवाडी 1, आरेफ कॉलनी 1, सिडको एन-पाच येथे 2, एन- वन येथे 1, हडको एन-बारा येथे 1, अन्य 254
ग्रामीण (64)
औरंगाबाद 16, फुलंब्री 5, गंगापूर 14, कन्नड 2, खुलताबाद 2, सिल्लोड 8, वैजापूर 5, पैठण 5, सोयगाव 7
जिल्हाधिकारी साहेबांशी संपर्क साधायचाय…
9156695872 या क्रमांकावर करा व्हिडिओ कॉल….!
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त अनेक अभ्यागतांचा राबता असतो. अनेकजण आपली तक्रार घेऊन जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेतो आणि आपली समस्या मांडतो. परंतु सध्या जिल्ह्यासह राज्यभरात कोविड रुग्णांची दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात देखील कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याने अभ्यागतांच्या भेटीवर निर्बंध् आले आहेत. परंतु सामान्य नागरिकांच्या समस्या मार्गी लागाव्यात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत 91566 95872 हा मोबाईल क्रमांक देण्यात आलेला आहे. या मोबाईल क्रमांकावर अभ्यागत दुपारी 3 ते 4 यावेळेत व्हिडिओ कॉल मार्फत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.