AurangabadCrimeUpdate : अखेर ‘तो ‘ लव्हबाॅय ताब्यात, तर रेकाॅर्डवरील बांगडीचोर अटकेत

औरंगाबाद : जालनारोडवरील मलाबार गोल्ड मधून रत्नजडीत बांगडी चोरी प्रकरणात रेकाॅर्डवरील संशयित महिलेला जिन्सी पोलिसांनी मुद्देमालासहित अटक केली. तिने बांगडीतील रत्ने काढून ती वितळवल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे. शबाना बेगम उर्फ शब्बो जमील शेख (३०) रा.भवानीनगर निजामगंज काॅलनी असे अटक महिला चोराचे नाव आहे. एक वर्षापूर्वी सिटीचौक पोलिसांनी पकडलेल्या महिला चोरांच्या टोळीत शब्बो चा समावेश होता.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुसर्या एका प्रकरणात राज्यभर गाजत असलेलय लव्हर बाॅयच्या व्हिडीओतील लव्हरला जिन्सी पोलिसांनी ताब्यात घेतले असून कारवाईची प्रक्रिया सुरु होती. सूरज कांबळे (२४) असे आरोपीचे नाव आहे. तो कपड्याच्या दुकानात नोकर आहे. ३१ डिसेंबर रोजी. रात्री १०.३० च्या सुमारास त्याने मित्राशी पैंज लावली की,मी बाईकवर प्रेयसीला किस करु शकतो. मित्राने लगेच बाईक सूरज च्या हवाली केली.सूरज ने प्रेयसीला क्रांतीचोकात बोलावून घेतले व प्रेयसीला बाईकवर सिनेस्टाईल बसवून क्रांतीचौक ते सेव्हन हिल व सेव्हनहिल ते क्रांतीचौक या ठिकाणी चालत्या बाईकवर अश्लील चाळे केले. या प्रकरणाचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला होता.
वरील दोन्ही प्रकरणाचा छडा पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे व पीएसआय गोकुळ ठाकूर यांच्या पथकाने लावला. यामधे पोलिस कर्मचारी नंदलाल चव्हाण, नंदू परदेशी, सुनिल जाधव यांनी सहभाग घेतला होता.तर पुढील तपास पीएसआय अनंता तांगडे करंत आहेत.