Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : नागालँडमध्ये गोळीबारात १३ नागरिकांचा बळी गेल्याने खळबळ

Spread the love

नवी दिल्ली : सैन्याला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार  नागालँडमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास  झालेल्या गोळीबारात १३ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याचे  धक्कादायक वृत्त आहे. मात्र हि गुप्त माहिती चुकीची निघाल्याने नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त होत असून जमावाने पोलिसांच्या तीन वाहनांना आगी लावून दिल्या. नागालँडच्या मोन जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या वृत्तामुळे खळबळ उडाली असून सकाळी मृतांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला, तेव्हा हा प्रकार समोर आला. यामध्ये एका जवानांचाही मृत्यू झाला असून या सर्व प्रकारच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 


दरम्यान या प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले असून गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री नैफियू रिओ यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. आसाम रायफल्सच्या सेक्युरिटी ऑपरेशनमध्ये या नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असून सरकारने याबाबत खुलासा करावा अशी मागणी राहुल गांधी यांनी एका ट्विटद्वारे केली आहे.

सैन्याचे निवेदन , गुप्त माहिती निघाली चुकीची !!

या घटनेबाबत जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , “आम्ही या घटनेबद्दल आणि त्यानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल खेद व्यक्त करतो. दुर्दैवाने गावकऱ्यांच्या जीवितहानीच्या कारणांची उच्च स्तरावर चौकशी केली जात आहे आणि कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. या घटनेमुळे सुरक्षा दलाच्या जवानांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यात एका सैनिकाचा मृत्यू झाला आहे. ”

सैन्याच्या दाव्यानुसार मोन प्रदेश हा नागा गट ( NSCN(K) आणि ULFA यांचा बालेकिल्ला आहे. ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा राज्य “हॉर्नबिल फेस्टिव्हल” साजरा केला जात आहे आणि अनेक दहशतवादी याच भागात आहेत. त्यातून हि घटना घडली. अतिरेक्यांच्या संभाव्य हालचालींबद्दल गुप्त माहितीवर आधारित सुरक्षा दलांनी तिरू-ओटिंग मार्गावर हल्ला करण्याची योजना आखली होती, परंतु ती पूर्णपणे अपयशी ठरली.

अमित शाह यांची संतप्त प्रतिक्रिया

या  प्रकरणावर  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संताप व्यक्त करताना आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि ,  “नागालँडच्या मोन जिल्ह्यात घडलेला प्रकार अत्यंत संतापजनक आहे. माझ्या भावना मृतांच्या नातेवाईकांसोबत आहेत. या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने नेमलेली उच्चस्तरीय एसआयटी सखोल तपास करेल आणि मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळेल”.

नेमकं काय घडलं?

याबाबतच्या वृत्तानुसार नागालँडच्या मोन जिल्ह्यातल्या तिनागालँडच्या मोन जिल्ह्यातल्या तिरु या गावात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटिंग गावातून काही लोक एका पिकअप व्हॅनमधून घरी परतण्यासाठी रात्रीच्या सुमारास निघाले. मात्र, ते घरी पोहोचलेच नाहीत. सकाळपर्यंत ते पोहोचले नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला. तेव्हा तिरू गावानजीक पिकअप व्हॅनमध्ये ११ जणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेत काही जखमी देखील असल्याचे सांगितले  जात असून मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.

मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन

दरम्यान या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी  पोलिसांच्या दोन गाड्या पेटवून दिल्या. या गाडीत दहशतवादी असल्याच्या संशयावरून ही कारवाई झाल्याचे सांगितले जात असले तरी पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत  पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून मुख्यमंत्र्यांनी एका ट्विटद्वारे “मोन जिल्ह्यात सामान्य नागरिकांच्या मृत्यूचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. या प्रकरणाचा उच्चस्तरीय एसआयटी चौकशी करेल. कायद्यानुसार गुन्हेगारांना शिक्षा होईल. माझं नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी शांतता राखावी”, असे आवाहन केले आहे.

राहुल गांधी यांची सरकारवर टीका

या घटेनवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत सरकार आणि गृहमंत्रालयावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, “हे हृदय पिळवटून टाकणारे आहे. भारत सरकारने खरे उत्तर दिले पाहिजे. आपल्याच भूमीत नागरिक किंवा सुरक्षा कर्मचारी सुरक्षित नसताना गृह मंत्रालय नेमके काय करत आहे?” असा संतप्त सवाल राहुल गांधी यांनी भारत सरकारला केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!