Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याबाबत र्थमंत्री निर्मला सितारमण यांनी दिली मोठी माहिती…

Spread the love

लखनौ :  देशातील अनेक  राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या चौकटीत आणण्यास विरोध केल्यामुळे  पेट्रोलियम उत्पादने  जीएसटीच्या चौकटीत आणण्याची ही योग्य वेळ नाही, असे  अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी म्हटले आहे. सितारमण  म्हणाल्या कि , ”पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याबाबत चर्चा झाली. केरळ हायकोर्टात या विषयावर एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर केरळ हायकोर्टाने सांगितले की हा विषय जीएसटी परिषदमध्ये आधी घेतला जावा, त्यानुसार हा विषय घेतला.” मात्र अनेक राज्यांच्या विरोधामुळे सध्या हे शक्य नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली ४५ वी मॅरेथॉन जीएसटी बैठक पार पडली. या बैठकीत केंद्र सरकार आणि राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पत्रकारांना बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली.

मात्र या बैठकीतील निर्णयानुसार  कोरोना व्यतिरिक्त महाग जीवनरक्षक औषधांना जीएसटीतून सूट देण्यात आली  असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी म्हटले आहे. दरम्यान कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मोफत आयात केली जाणारी श्वसनयंत्रे, प्राणवायू विलगीकरण यंत्रांसारखी साह्यभूत सामग्री तसेच, म्युकरमायकोसिसवरील ‘अ‍ॅम्फोटेरीसिन-बी’ची कुपीही वस्तू व सेवा करातून (जीएसटी) वगळण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल, अशी घोषणाही त्यांनी या  पत्रकार परिषदेत दिली.

याशिवाय दिव्यांग व्यक्तींसाठी वाहनांमध्ये रेट्रो-फिटमेंट किटवर  , बायोडिझेलवर  ५ टक्के, एकात्मिक बालविकास सेवा योजनेसारख्या योजनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फोर्टिफाईड राईस कर्नल्सवर केवळ ५ टक्के जीएसटी आकारली जाणार असून मालवाहतूक वाहनांना संपूर्ण भारतात किंवा राज्यांमध्ये वाहने  चालवण्यासाठी परमिट देण्यासाठी राष्ट्रीय शुल्क आकारले जाते . जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.

जीएसटी कलेक्शन अपडेट

जीएसटी कलेक्शन अपडेट देताना माहिती देण्यात आली कि , गेले काही महिने जीएसटी कलेक्शन एक लाख कोटींच्या पार जमा होत आहे. मात्र जून महिन्यात कलेक्शन एक लाख कोटींच्या खाली जमा झाले  होते . त्यानंतर जुलै महिन्यात पुन्हा एकदा सकारात्मक परिणाम दिसून आले आणि एक लाख कोटींच्या पार कलेक्शन जमा झालं होते.  ऑगस्ट महिन्यातही एक लाख कोटींच्या पार कलेक्शन झाले  आहे. गेल्या महिन्यात सरकारी तिजोरीत जीएसटीपोटी १.१२ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. ऑगस्ट २०२० या महिन्याच्या तुलनेत ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र जुलै महिन्यातील जीएसटी कलेक्शन १.१६ लाख कोटी होते. जुलै महिन्याच्या तुलनेत या महिन्यात तूट दिसून येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!