Aurangabad NewsUpdate : श्रावण पौर्णिमा निम्मित भिख्खु निवासाचा उद्घाटन सोहळा

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील शंकरपूर या गावांमध्ये पूर्वाराम भिख्खु निवास येथे नुकताच श्रावण पोर्णिमेनिम्मित उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी सकाळी धम्मचक्क पवत्तन सुत्तपठन तसेच मंगलमैत्रि भिक्खु संघाचे भोजनदान दुपारी भिक्खु निवासाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले तसेच धम्मदेशना होऊन आशीर्वाद आणि संध्याकाळी आगाठाण येथील महेंद्र मोकळे यांचा बुद्ध भिम गीतांचा कार्यक्रम यावेळी कोविड नियमाचे पालन करत संपन्न झाला.
याप्रसंगी नंदुरबार चे भिक्खु गुणरत्न महाथेरो ,तेलंगणा चे भिक्खु राष्ट्रपाल महाथेरो , मावसाळा चे भिक्खु एस प्रज्ञाबोधी महाथेरो ,श्रीलंका येथील भिक्खु एम धम्मज्योती थेरो , भिक्खु काश्यप , भिक्खु आनंद तसेच भिक्खुनि संघ यांची प्रमुख उपस्थिती होती
या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय भिख्खु संघ बुध्दगया चे सदस्य तसेच धम्मसम्राट फाऊंडेशन महाराष्ट्र चे अध्यक्ष भिक्खु शाक्यपुत्र अमृतानंदबोधी यांनी केले होते यासाठी त्यांना लासुरचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवी पोळ,
ग्रामपंचायत सदस्य अमोल सिरसाट,फुलंब्री च्या मुख्याधिकारी नंदा गायकवाड,राहुरी चे नायब तहसीलदार खिवराज दुशिंग,गंगापूर चे संजय कांबळे यांच्या सह उपासक उपसिका यांनी सहकार्य केले.