Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : सोनिया गांधी आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा : शरद पवार

Spread the love

मुंबई : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षातील समविचारी नेत्यांशी आज व्हर्चुअल बैठक घेऊन चर्चा केली. या बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सोनिया गांधींशी संवाद साधताना सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा सल्ला दिला.या बैठकीत १५ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. ‘सोनिया गांधी यांनी चर्चेसाठी सर्व विरोधी पक्षांना बोलावले होते.

या बैठकीविषयी ट्विटवरवरून माहिती देताना शरद पवार यांनी म्हटले आहे कि , ही बैठक सकारात्मक झाली आहे. या बैठकीमध्ये मी माझे मुद्दे उपस्थितीत केले. मोदी सरकार अनेक मुद्यांवर तोडगा काढण्यास अपयशी ठरली आहे. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर जी लोकं विश्वास ठेवतात, जे लोकशाहीचे सिद्धांत वाचवण्यासाठी लढा देत आहे. त्यांना एकत्र घेऊन लढा दिला पाहिजे, असं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले आहे. एक वेळबद्ध कार्यक्रम सुरू करण्याची आवश्यकता आहे. पण, आपण सर्व मुद्यांवर लढण्यापेक्षा प्राथमिकता ठरवून नियोजन करणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्या देशाला एक चांगले भविष्यात देण्यासाठी काम करावे, असे ही पवार यांनी म्हटले आहे.

 

या वेळी पवार यांनी पुढे म्हटले आहे कि , ‘अंतिम लक्ष्य 2024 लोकसभा निवडणुका आहेत. ज्यासाठी पद्धतशीर नियोजन करावे लागेल. हे एक आव्हान आहे पण एकत्र आपण ते करू शकतो कारण पर्याय नाही. प्रत्येकाची स्वतःची अडचण असते पण राष्ट्रहिताची मागणी असते की आपण सर्वांनी आपल्या अडचणीवर बाजूला सारून पुढे आले पाहिजे. सहकार मंत्रालयाचा मुद्दा बैठकीत उपस्थित करून तो राज्य सरकारच्या घटनात्मक अधिकार आणि जबाबदाऱ्यांमध्ये हस्तक्षेप आहे’ असा आरोपही पवारांनी केला.

या बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. तसंच, या बैठकीला राहुल गांधी, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन सहभागी झाले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!