Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशभरात ३९ हजार ७० नवीन करोनाबाधित

Spread the love

नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासात ४३ हजार ९१० रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ३९ हजार ७० नवीन करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, ४९१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ही ३,१९,३४,४५५ झाली आहे. देशात ४,०६,८२२ अॅक्टिव्ह रूग्ण असून, एकूण ४,०६,८२२ जण करोनातून बरे झाले आहेत. तर, आजपर्यंत देशात ४,२७,८६२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर देशात आजपर्यंत ५०,६८,१०,४९२ जणांचे लसीकरण झाले असून, यापैकी ५५,९१,६५७ जणांचे मागील २४ तासात लसीकरण झाले आहे.

दरम्यान, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या करोना प्रतिबंधक एक मात्रेच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी काल(शनिवार) दिली आहे. ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या लशीला परवानगी देण्यात आल्याने करोनाविरोधातील भारताच्या लढ्याला बळ मिळेल, असे मंडाविया यांनी सांगितले आहे. जॉन्सन अँड जॉन्सन ही अमेरिकी औषध उत्पादक कंपनी आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!