Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CongressNewsUpdate : काँग्रेस सोडणारे लोक आरएसएसचे , राहुल गांधी यांची टीका

Spread the love

नवी दिल्ली : काँग्रेस सोडणारे नेते संघाचे लोक आहेत.  काँग्रेसला निडर नेत्यांची गरज आहे. कमजोर नेत्यांची नाही. संघाच्या विचारधारेवर विश्वास ठेवतील अशी माणसं काँग्रेसला नको आहेत.  अशा नेत्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवायला हवा अशा कडक शब्दात राहुल गांधींनी सुनावले  आहे. पक्षाच्या सोशल मीडिया यूनिटच्या बैठकीत ते बोलत होते.


सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना खासदार राहुल गांधी म्हणाले की, देशात खूप असे नेते आहेत जे निडर आहेत, पण काँग्रेसमध्ये नाहीत. या नेत्यांना पक्षात आणले पाहिजे. जे भाजपाला घाबरतात अशा काँग्रेसी नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे. आम्हाला अशा नेत्यांची गरज नाही. जे आरएसएसच्या विचारधारेवर विश्वास ठेवतात. आम्हाला निडर लोकांची गरज आहे असं त्यांनी सांगितले. खूप सारे लोक आहेत जे घाबरत नाहीत. त्या सगळ्यांना काँग्रेसमध्ये आणावं. जे आमच्याकडे घाबरतात त्यांनी बाहेर पडावे. तुमची गरज नाही, आरएसएसमध्ये जा, आम्हाला निडर लोकांची गरज आहे. ही आमची आयडियोलॉजी आहे .

काँग्रेसमधून भाजपात गेलेले ज्योतिरादित्य शिंदे आणि जितीन प्रसाद यांच्यासारख्या नेत्यांच्या पक्षांतराविषयी राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच अशी टिप्पणी केली. दरम्यान त्याचबरोबर काँग्रेसमध्ये राहून ज्यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे अशांनाही  राहुल गांधींनी स्पष्ट इशाराच दिला आहे. पक्षाच्या नेतृत्वाबद्दल काँग्रेसमध्ये जी २३ नेत्यांचा गट बनला होता त्यांच्यावरही राहुल गांधींनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!