Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharshtraUpdate : जाणून घ्या राज्याची आजची कोरोनाची संख्या

Spread the love

मुंबई:  गेल्या २४ तासात राज्यात आज दिवसभरात १० हजार ६९७ नव्या कोरोना  बाधित रुग्णांचे निदान झाले  असून एकूण १४ हजार ९१० इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज दिवसभरात ३६० करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे  राज्यातील  कोरोनाचा मृत्यूदर १.८४ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ३१ हजार ७६७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४८ टक्क्यांवर पोहोचले आहे.

राज्यात १ लाख ५५ हजार ४७४ सक्रिय रुग्ण

दरम्यान राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ५५ हजार ४७४ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी तीत घटही होताना दिसत आहे. पुण्यात एकूण १८ हजार ३५० इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार ०६५ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १५ हजार ८०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ५२० इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६ हजार ६२७ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ७८१ इतकी आहे.

या बरोबरच अहमदनगरमध्ये ५ हजार १८७ इतकी आहे. औरंगाबादमध्ये १ हजार ८१८, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार ४४१ इतकी आहे. जळगावमध्ये ३ हजार ००६, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार ८९३ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या २ हजार १३३, तर, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या बुलडाणा जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ४३ इतकी आहे.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ७८ लाख ३४ हजार ०५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८ लाख ९८ हजार ५५० (१५.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ६३ हजार २२७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ५ हजार ८०७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

पुण्यात आज ३३१ नवे रुग्ण, तर १० रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात आज दिवसभरात ३३१ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर ४ लाख ७३ हजार ८७० इतकी रुग्णसंख्या झाली आहे. तर याच दरम्यान १० रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ८ हजार ४६६ झाली आहे. त्याच दरम्यान ४५९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ४ लाख ६२ हजार २२२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

परभणी मनपात आज एकही रुग्ण नाही

राज्यात आज एकूण 10697 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, परभणी महानगरपालिकेच्या अंतर्गत आज एकही रुग्णाची नोंद झालेली नाहीये. परभणीकरांसाठी एक मोठी दिलासादायक आणि चांगली बातमी आहे.

आज कुठल्या विभागात किती रुग्णांची नोंद?

ठाणे मंडळ – 2267

नाशिक मंडळ – 978

पुणे मंडळ – 2760

कोल्हापूर मंडळ – 3503

औरंगाबाद मंडळ – 224

लातूर मंडळ – 361

अकोला मंडळ – 387

नागपूर मंडळ – 217

एकूण – 10,697

आपलं सरकार

Click to listen highlighted text!