Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि महाविद्यालयातच दिली जाणार लस

Spread the love

मुंबई : देशातील १८ पेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना दिनांक १ मे पासून लस दिली जाणार  असून यात राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या सुमारे ३६ लाख ८७० विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये लस दिली जाईल असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना लसीकरण दिलासा मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंसोबत कॉलेज आणि विद्यापीठीय परीक्षांबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनुसार राज्यातील १८ वर्षावरील नागरिकांना लास देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ज्याची अंमलबजावणी १ मे पासून होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता १८ वर्षावरील विद्यार्थ्यांना लस मिळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊन हे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.

दरम्यान शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यात येणार असून याबाबत येत्या १५ दिवसात निर्णय घेण्यात येईल. सर्व परीक्षा घेत असताना एकही विद्यार्थी कोरोना बाधित होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येईल. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे, असेही ते यावेळी म्हणाले. उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, सीईटी सेल आयुक्त चिंतामणी जोशी, कला संचालक राजीव मिश्रा, सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू व संबंधित उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!