Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने जप्त केला ९ लाखाचा गांजा, तिघे गजाआड

Spread the love

औरंंगाबाद : लॉकडाऊन काळात शहरात विक्री करण्यासाठी कारमधुन गांजाची वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने सापळा रचून गजाआड केले. ही कारवाई गुरूवारी (दि.२२) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास चिकलठाणा ते क्रेब्रीज हायस्कूल दरम्यान असलेल्या झाल्टाफाटा येथे करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ९ लाख ४७ हजार ८६० रूपये किंमतीचा ४७ किलो १९३ ग्रॅम गांजा, एक विना क्रमांकाची दुचाकी, एक कार, तीन मोबाईल, रोख रक्कम असा एकूण १५ लाख ४९ हजार ९६० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात शहरात जास्तीच्या दराने विक्री करण्यासाठी तीन जण एका कारमधुन गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांना मिळाली होती. पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक राहुल रोडे, पोलिस अंमलदार सय्यद शकील, ए.आर.खरात, मनोज विखनकर, विजय निकम, अविनाश जोशी, इमरान पठाण, व्ही.एस.पवार, फोटोग्राफर राजेंद्र चौधरी आदींच्या पथकाने झाल्टाफाटा येथे सापळा रचून गुरूवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कार क्रमांक (एमएच-४७-सी-७५२८) अडवली. पोलिसांनी कारचालक मंहमद इद्रीस मंहमद इसा (वय ३५, रा.गरमपाणी), आवेज खान मेहमुद खान (वय २७, रा.मोमीनपुरा, लोटाकारंजा) या दोघांना ताब्यात घेतले. तसेच विनाक्रमांकाच्या ुदुचाकीवर आलेल्या विजय संजय ठाकरे (वय २५, रा.अजनाळे, ता.जि.धुळे) याला देखील ताब्यात घेतले.

पोलिसांनी कारची झडती घेतली असता, कारमध्ये जवळपास ९ लाख ४७ हजार ८६० रूपये किंमतीचा ४७ किलो १९३ ग्रॅम गांजा मिळून आला.

पोलिसांनी तिघांच्या ताब्यातून जवळपास ९ लाख ४७ हजार ८६० रूपये किंमतीचा ४७ किलो १९३ ग्रॅम गांजा, एक विना क्रमांकाची दुचाकी, एक कार, तीन मोबाईल, रोख रक्कम असा एकूण १५ लाख ४९ हजार ९६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस अमंलदार विजय निकम यांनी दिलेल्या तक्रारीवरून गांजाची वाहतूक करणाऱ्या तिघांविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!