Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCoronaUpdate : देशात सक्रिय रुग्णांची संख्या १९ लाख २९ हजार ३२९ , २ लाख ७३ हजार ८१० नवे रुग्ण

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने  जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात  २ लाख ७३ हजार ८१० करोनाबाधित रुग्ण आढळले असून   १ हजार ६१९ करोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर १ लाख ४४ हजार १७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान  देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत देशात एकूण १ लाख ७८ हजार ७६९ नागरिकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशात १९ लाख २९ हजार ३२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने  (ICMR)दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २६ कोटी ७८ लाख ९४ हजार ५४९ नमुन्यांची तपासणी करण्यात आलीय. यातील १३ लाख ५६ हजार १३३ नमुन्यांची करोना चाचणी रविवारी झाली.

एकूण करोना संक्रमित रुग्णांची संख्या : १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९

एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : १ कोटी २९ लाख ५३ हजार ८२१

उपचार सुरू : १९ लाख २९ हजार ३२९

एकूण मृत्यू : १ लाख ७८ हजार ७६९

रविवारी एकूण २ लाख ७३ हजार ८१० करोनाबाधित रुग्ण आढळले

२४ तासांत देशात १ हजार ६१९ करोनाबाधितांचा मृत्यू

२४ तासांत १ लाख ४४ हजार १७८ रुग्णांनी करोनावर केली मात१२ कोटी ३८ लाख ५२ हजार ५६६

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!