AurangabadNewsUpdate : औरंगाबाद आता दुपारी १ नंतर बंद , अत्यावश्यक कारण आणि अत्यावश्यक सेवेशिवाय भटकण्यावर बंदी

• जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद
• भाजी मंडई : सकाळी 7 ते 1
औरंगाबाद : कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजना दि. 1 मे 2021 रोजीच्या सकाळी 7.00 वाजे पर्यंत कायम राहणार असून या आदेशातील नमूद करण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ असलेल्या सेवा आणि आस्थापना यांना सूट देण्यात आलेल्या वेळेमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत असून खाली नमूद केल्याप्रमाणे वेळ अंमलात राहिल. सदरचे आदेश संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यासाठी लागू राहतील. जिल्ह्यातील आठवडी बाजार भरविण्यावर बंदी असून, भाजी मंडई सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या नवीन आदेशानुसार सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक कारण आणि अत्यावश्यक सेवेशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई राहिल. अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी/ कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित असणारे अधिकारी/ कर्मचारी यांना ओळखपत्रासह संचार करण्यास परवानगी आहे. यामध्ये ग्णालय, रोग निदान केंद्र, चिकित्सालय , लसीकरण केद्रें, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यांचा त्यांना आवश्यक अशा अनुषंगिक उत्पादन आणि वितरण तसेच वितरक, वाहतूक आणि पुरवठा साखळी यांचा देखील समावेश असेल. लस, निर्जतुके, मास्क, वैद्यकीय उपकरणे, त्यांना सहाय्यभुत कच्चा माल उद्योग आणि अनुषंगिक सेवा यांचे उत्पादन व वितरण यांचादेखील समावेश असेल पूर्ण वेळ : (24 तास)
कोविड चाचणी : लसीकरण पूर्ण वेळ : ( 24 तास)
1.5 पशुवैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राणी, पशुखाद्याची दुकाने, Pet Shop, कृषि संबंधित सेवा – बियाणे, खते, अवजारे व त्यांची दुरुस्ती इ. फक्त : सकाळी 7 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत
1.6 अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने (किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने – पार्सल सेवा, चिकन, मटण, अंडी, मासे, पोल्ट्री दुकाने, गॅस सिलेंडर पुरवठा, ॲटोमोबाईल्स दुकाने) : गॅरेज फक्त : सकाळी 7 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत
1.7 ऑप्टीकल्स-चष्मा दुकाने फक्त : सकाळी 7 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत
2. शासकीय कार्यालये
2.1 आरोग्य सेवा, वीज, पाणी, बँकींग, वित्तीय सेवा, आपत्ती व्यवस्थापन 100 % उपस्थिती (ओळखपत्र लावणे अनिवार्य)
2.2 स्थानिक प्राधिकरणाच्या अत्यावश्यक सेवा पूर्ण वेळ : ( 24 तास)
2.3 इतर शासकीय कार्यालये 50 % उपस्थिती (कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी चालू ठेवायचे असल्यास शासकीय विभागांचे/कार्यालयांचे प्रमुख (HOD) यांचे निर्णयानुसार 100% क्षमतेने सुरु – ओळखपत्र लावणे अनिवार्य)
2.4 शासकीय बैठका फक्त ऑनलाईन पद्धतीने
2.5 शासकीय कार्यालयांमध्ये विनापरवानगी अभ्यागतांना प्रवेश (पोलीस स्टेशन वगळता) प्रवेश बंदी
2.6 शासकीय कार्यालयात कार्यालयप्रमुखाची पूर्वपरवानगी घेऊन भेट देणारा अभ्यागत भेट देण्यापूर्वी 48 तासांच्या आत RTPCR/ RAT/ TruNAT/ CBNAAT Test चाचणी निगेटिव्ह असेल तरच प्रवेश
3. निमसरकारी- खाजगी कार्यालये
3.1 बँका, वीज वितरण कंपनी, टेलिकॉम कंपन्या, विमा, मेडीक्लेम कंपनी, औषधी वितरण/उत्पादन कार्यालये पूर्ण वेळ : ( 24 तास)
3.2 इतर सर्व खाजगी कार्यालये बंद
3.3 SEBI व SEBI अंतर्गत मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर्स संस्था उदा. स्टॉक एक्सचेंजेस, गुंतवणूक व क्लिअरिंग कार्पोरेशन्स, SEBI अंतर्गत नोंदणीकृत संस्था, RBI अंतर्गत नोंदणीकृत व मध्यवर्ती संस्था उदा. स्वतंत्र प्राथमिक डिलर्स, CCIL, NPCL, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, फायनान्शिअल मार्केट, सर्व प्रकारचे Non-Banking वित्तीय संस्था, सर्व सूक्ष्म वित्तीय संस्था, CA, वकीलांचे कार्यालये, कस्टम हाऊस एजंट/लसीकरणाशी संबंधित परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर/जीवरक्षक औषधे/औषधी उत्पादने फक्त : सकाळी 7 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत
3.4 बोर्ड, विद्यापीठ किंवा प्राधिकरण यांची परीक्षा घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची परवानगी घेऊन – परीक्षार्थी व परीक्षेसाठी नियुक्ती असणारे अधिकारी/कर्मचारी सूट (सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत)
4 अत्यारवश्य्क सेवा
4.1 रेल्वे, टॅक्सी, ऑटो, सार्वजनिक बस सेवा, स्थानिक स्वराज्य संस्थेची मान्सून पूर्व कामे, मालवाहतूक, स्थानिक प्राधिकरणांच्या सार्वजनिक सेवा, मान्यताप्राप्त मिडीया पूर्ण वेळ : ( 24 तास)
4.2 बस, रेल्वे, विमान यांद्वारे प्रवास करणा-या प्रवाशांना घरापासून बसस्थानक, रेल्वे स्थानक, विमानतळापर्यंत व तेथून घरापर्यंत जाण्यासाठी परवानगी वैध तिकीटाचे आधारे परवानगी राहिल.
4.3 उद्योगांमध्ये काम करणारे कामगार यांना कामावर जाण्यासाठीची परवानगी वैध ओळखपत्राचे आधारे परवानगी राहिल.
(10% व्यवस्थापकीय कर्मचारी ) : ओळखपत्र रिबीनसह गळ्यात
4.4 दुकाने, बाजारपेठ, मॉल्स (अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळून) बंद राहतील.
4.5 पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादन, कार्गो सेवा, डाटा सेंटर्स/क्लाउड सर्व्हिस पुरवठादार/माहिती व तंत्रज्ञान सेवेशी संबंधित सेवा, शासकीय/खाजगी सुरक्षा सेवा, गॅरेजेस, टायर पंक्चर दुकाने, दूरसंचार सेवा सुरळित राहण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी/सेवा अत्यावश्यक सेवेसाठी पूर्ण वेळ : 24 तास
नागरिकांसाठी : सकाळी 7 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत
5 खाजगी वाहतूक व्येवस्था
5.1 ऑटोरिक्षा पूर्ण वेळ : (24 तास) – चालक व 2 प्रवासी फक्त (Driver + 2 Passengers only) ,
नियमांचा भंग केल्यास दंड रु.500/-
5.2 टॅक्सी/कॅब पूर्ण वेळ :(24 तास) – चालक व परिवहन नियमांनुसार अनुज्ञेय क्षमतेच्या 50 % वाहन क्षमता (Driver + 50 % vehicle capacity as per RTO) नियमांचा भंग केल्याcस प्रवासी व चालक प्रत्ये की दंड रु.500/-
5.3 सार्वजनिक बस सेवा पूर्ण वेळ : 24 तास – परिवहन विभागाच्या मान्यतेनुसार पूर्ण आसन क्षमतेने परवानगी आहे. परंतु प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहिल.
5.4 रेल्वे पूर्ण वेळ :(24 तास) – विनामास्क व उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहिल.
नियमांचा भंग केल्याईस दंड रु.500/–
5.5 खाजगी वाहने, खाजगी बसेस अत्यावश्यक सेवेसाठी आपत्कासलीन सेवेसाठी तसेच या आदेशात नमूद केलल्याा कारणांसाठी
6 बांधकाम व उत्पानदन क्षेत्र
6.1 बांधकामाच्या ठिकाणी मजुरांना राहण्याची सोय असल्यास असे बांधकाम तसेच बांधकाम/ विकासकामांकरिता लागणारी सामग्री ने-आण करणे पूर्ण वेळ : 24 तास. नियमाचे भंग झाल्याीस सदर व्या वसायिकास रु.10000/- दंड
6.2 उत्पादन करणा-या उद्योग आस्थापना/कंपन्या/घटक पूर्ण वेळ : (24 तास
7 रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स/ खाद्यपदार्थ विक्रेते
7.1 रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स केवळ घरपोच सेवा (Home delivery) देण्यास परवानगी : सकाळी 7 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत
नियमाचे भंग केल्याoस रु.1000/- दंड व संबंधीत आस्थािपनेला रु.10000/- दंड
7.2 रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांची विक्री करणारे विक्रेते फक्त पार्सल सुविधा व होम डिलीवरी सुविधा : सकाळी 7 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत
नियमांचे उल्लंघन करणा-यास रु.500/- दंड व संबंधीत विक्रेत्यालस रु.500/- दंड व संबंधीत दुकान Covid-19 संपे पर्यंत बंद
8 वृत्तपत्रे
8.1 शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रे, उपग्रह वाहिनीवरुन प्रसारित होणारे चॅनल्स, अधिस्वीकृतीधारक (Accreditation) पत्रकार (साप्ताहिक, Youtube Channel, Web Portal वगळून) पूर्ण वेळ : ( 24 तास )8.2 वितरण फक्त : सकाळी 7 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत
8.3 छपाई पूर्ण वेळ : (24 तास )
9 करमणूक व मनोरंजन
9.1 चित्रपटगृहे, सिनेमा हॉल्स, नाट्यगृहे व सभागृहे, मनोरंजन केंद्रे (Amusement Parks) / Arcades/ व्हिडीओ गेम सेंटर्स, वॉटर पार्क्स (Water Parks), क्लिबर्स् , जलतरण तलाव, व्यायामशाळा (Gyms) व स्पोर्ट कॉम्लेर् क्स बंद राहतील
9.2 मोकळ्या जागावरील उपक्रम, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे,बगीचे/उद्याने, सार्वजनिक मैदाने, खेळाची मैदाने, क्रिडांगणे, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, योगा क्लासेस, जिम, व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद राहतील.
10 धार्मिक/ सामाजिक बाबी
10.1 धार्मिक स्थळे/प्रार्थनास्थळे (नियमित अर्चक यांना पूजा करण्याची सूट राहिल) बंद : फक्त पुजारी, इमाम, पाद्री, धर्मगुरु, भंते इ. नियमित पूजा अर्चा सुरु
10.2 धार्मिक/सामाजिक/राजकीय/सांस्कृतिक कार्यक्रम बंद
10.3 मुस्लीम बांधवाचा रमजानचा महिना लक्षात घेऊन दूध व फळे यांचेशी संबंधित दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत तसेच
सायंकाळी 5 ते 8.00 वाजेपर्यंत
10.4 लग्न समारंभ 25 लोकांच्या उपस्थितीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची (न.प./न.पं./ग्रा.पं.) पूर्वपरवानगी घेऊन संबंधित Incident Commander तथा तहसिलदार यांची परवानगी घेतली असल्यास. (सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत)
10.5 अंत्यविधी कार्यक्रम केवळ 20 लोकांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण वेळ : 24 तास
11 शाळा/ महाविद्यालय/कोचिंग
11.1 शाळा, महाविद्यालये बंद
11.2 शाळा, महाविद्यालये केवळ इयत्ता 10 वी व 12 वी च्या परीक्षेकरीता विद्यार्थी व परीक्षेसंबंधित स्टाफ यांना परीक्षेकामी ये-जा करणे फक्त : सकाळी 7 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत
11.3 कोचिंग क्ला सेस, खाजगी शिकवण्या बंद
11.4 विद्यार्थ्यांना परीक्षेकरिता प्रत्यक्षपणे संबंधित केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे व तेथून घरी जाणे वैध प्रवेशपत्राचे आधारे परवानगी राहिल.
12 इतर बाबी
12.1 केशकर्तनालय/स्पा/सलुन/ब्युटी पार्लर बंद
12.2 ऑक्सी्जन उत्पापदन पूर्ण वेळ सुरु
12.3 ई-कॉमर्स (अत्यावश्यक सेवेकरिता) सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत (ओळखपत्र बाळगणे अनिवार्य)
12.4 कोणत्याही सहकारी गृह निर्माण संस्थेत एका वेळी पाच कोरोना सकारात्मक अहवाल आलेल्या व्यक्ती आढळल्यास सदर सहकारी गृह निर्माण संस्था सुक्ष्म प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केले जाईल. अशा सुक्ष्मर प्रतिबंधात्मरक क्षेत्रामध्येत अभ्याूगतांना प्रवेश बंद असेल. नियमाचे भंग झाल्याेस रु.10000/- दंड
12.5 घरगुती मदतनीस/वाहनचालक/स्वयंपाकी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची (न.प./न.पं./ग्रा.पं.) पूर्वपरवानगी घेऊन Incident Commander तथा तहसिलदार यांनी परवानगी दिल्यास सूट
टिप – ज्या खाजगी कार्यालये/हॉटेल्स/किराणा दुकाने/औषधी दुकाने/पेट्रोल पंप/गॅरेजेस/ इत्यादींना ज्या कालावधीसाठी चालू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे तेथे काम करणा-या व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घेणे गरजेचे आहे. अथवा त्यांनी दि.14 एप्रिल 2021 पासून सोबत RTPCR/ RAT/ TruNAT/ CBNAAT Test चे निगेटिव्ह रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहिल. त्या अहवालाची (Test Report) वैधता १५ दिवस राहिल.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्यास कलम 188, आपत्ती व्यावस्था पन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतूदीप्रमाणे फौजदारी कारवाईस पात्र राहील.
सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 14/04/2021 रोजी रात्री 08.00 पासून तात्काळ लागू करण्यात येत असून सदर आदेश दि. 1 मे 2021 रोजीचे सकाळी 7-00 वाजेपर्यंत लागू राहील. तसेच राज्य शासनाने, केंद्र शासनाने व या कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील असेही जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.