Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणारे तिघे गजाआड

Spread the love

औरंगाबाद : कोरोनाबाधित रुग्णांसाठी लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन सहजासहजी बाजारात उपलब्ध नसल्याचा फायदा घेत इंजेक्शनचा काळाबाजार करत साठवून चढ्या भावात विकणाऱ्या टोळीचा पुंडलिकनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हा प्रकार गारखेड्यातील पंडीत नेहरू महाविद्यालयासमोर घडला, टोळीतील तिघांना १६ एप्रिल रोजी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दोघा मेडीकल चालकाचा समावेश असून तिसरा संशयित घाटी रुग्णालयात नोकरीस आहे.


मंदार अनंतराव भालेराव (२९, रा. सीएल-९६६/६ बारावी योजना शिवाजीनगर), अभिजीत नामदेव तौर (रा. सहयोग नगर गारखेडा), अनिल ओमप्रकाश बोहते (रा. शिवाजीनगर) अशी त्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी औषधे निरीक्षक राजगोपाल बजाज (५५) यांनी फिर्याद दिली. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांना संशयित मंदार भालेराव हा रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या भावाने म्हणजे तब्बल १४ ते १५ हजार रुपये प्रति इंजेक्शन या भावाने विक्री करत असल्याची माहिती गुप्त माहिती मिळाली होती.

दरम्यान पोलिस, पंच, औषधे निरीक्षक आदिंच्या पथकाने सापळा लावत संशयित भालेराव याच्या मोबाईलवर संपर्क करत इंजेक्शन पाहिजे असल्याचे पंटरने त्याला सांगितले. काही वेळाने भालेरावने पंटरला फोन १५ हजार रुपयांत इंजेक्शन देतो सांगत सुतगिरणी चौकात मला भेटा असे म्हणाला. सुतगिरणी चौकात भालेरावने पंटरने १५ हजार रुपये घेतले आणि तीन तासानंतर तुम्ही सांगेल त्या ठिकाणी इंजेक्शन आणून देतो असे सांगितले. दरम्यान भालेराव हा सायंकाळी साडेसात वाजता पंडीत जवाहरलाल नेहरू महाविद्यालय, गारखेडा परिसर औरंगाबाद येथे अर्ध्या तासात येणार आहे अशी माहीती पोलिसांना मिळाली.

याबाबतची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे, अंमलदार सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, विलास डोईफोडे, दिपक जाधव, राजेश यदमळ, अजय कांबळे, प्रविण मुळे यांच्या पथकाने सापळा रचत महाविद्यालयाच्या कंपाऊंडच्या आडोशाला अंधारात थांबले. दरम्यान भालेराव याने पंटरला संपर्क करत ५ मिनीटात महाविद्यालय रस्त्यावर येतो असे म्हटल्याने ही माहिती पंटरने पोलिसांना कळविली.

दरम्यान भालेराव हा दुचाकीवर (एम.एच. २० सी.सी. ८६६८) आला आणि पंटरला इंजेक्शन देत असतानाच भालेराव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता, भालेराव याचे शिवाजीनगर येथे मयुरेश्वर मेडीकल अॅण्ड जनरल स्टोअर्स असल्याचे समोर आले. त्याने पोलिसांना इंद्रा मेडीकलचे मालक अभिजीत नामदेव तौर याच्याकडून १३ हजार ५०० रुपयांत इंजेक्शन विकत घेतल्याचे सांगितले. हे इंजेक्शन विक्रीच्या बदल्यात भालेराव याला १५०० रुपये मिळत होते. संशयितांकडे इंजेक्शनची बीलेही आढळून आली नाहीत. अधिकच्या तपासात शासकीय रुग्णालयात (घाटी) नोकरी करणाऱ्या अनिल ओमप्रकाश बोहते याने विकण्यासाठी दिल्याची कबुली भालेराव याने दिली. त्यानुसार पोलिसांनी तीन रेमडेसिवीर इंजेक्शन, दुचाकी, मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!