Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : पुढचे ४ आठवडे हे अतिशय चिंतेचे, महाराष्ट्रातील ७ जिल्ह्याची स्थिती गंभीर

Spread the love

देशात टॉप १० मध्ये असलेल्या महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांमधील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या


पुण्यात करोनाचे सर्वाधिक ८१,३७८ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत ७३२८१, ठाणे ५७६३५, नागपूर ५५९२६, नाशिक ३४५४०, औरंगाबाद १६८१८, आणि अहमदनगरमध्ये १५७१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी ५८ टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातून येत आहेत. करोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील ३४ टक्के रुग्णांची समावेश आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये आठवड्याला ३००० हजार रुग्ण आढळून येत होते. आता ही संख्या वाढून ४४ हजारांवर गेली आहे. राज्यात रोज ३२ ते २५० जणांचा करोनाने मृत्यू होत आहे, अशी माहिती भूषण यांनी दिली.


नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज माध्यमांना देशातील करोनाच्या स्थितीची सविस्तर माहिती दिली. देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या करोनाचे ८१, ३७८ रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. दरम्यान देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या टॉप १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रीतील  पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगबाद आणि अहमदनगर ७ या जिल्ह्यांमध्ये करोना अॅक्टिव्ह रुग्ण मोठ्या संख्येत आहेत .दरम्यान पुढील पुढचे ४ आठवडे हे अतिशय चिंतेचे असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असेही भूषण म्हणाले.

दरम्यान महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वाढत असताना लसीकरण मोहीम मात्र जोरात सुरू आहे. लसीकरणात महाराष्ट्राची कामगिरीही कौतुकास्पद आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जनतेचा सहभाग अत्यंच गरजेचा आहे. नागरिकांना करोनासंबंधी आपले वर्तन  सुधारले आणि लसीकरणाचासाठी पुढाकार घेतला तर आपण करोनाची ही दुसरी लाट नियंत्रणात आणू शकतो, असे  आवाहन निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही.के. पॉल यांनी केले आहे.

पुढचे ४ आठवडे हे अतिशय चिंतेचे

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून आता केंद्र सरकारने गंभीर इशारा  दिला आहे. पुढचे ४ आठवडे हे अतिशय चिंतेचे आहेत. आता अशा परिस्थितीत थोडाही निष्काळजीपणा दाखवला तर तो भोवेल. करोनाची दुसरी लाट नियंत्रित करण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा आहे, असं केंद्र सरकारने म्हटले  आहे. देशात करोनाचे वाढते रुग्ण आणि लसीकरणाच्या स्थितीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण  यांनी आज माध्यमांना माहिती दिली. देशातील करोनाचे एकूण रुग्णांपैकी ९२ टक्के रुग्ण हे करोनामुक्त झाले आहेत. करोनाने १.३ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास ६ टक्के करोनाचे नवीन रुग्ण आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा आठवड्याचा पॉझिटिव्ही दर हा ६ टक्के झाला होता. तो आता वाढून २४ टक्क्यांवर गेला आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे.

महाराष्ट्राशिवाय  इतर तीनमध्ये दिल्ली, बेंगळुरू आणि छत्तीसगडमधील एका जिल्ह्याचा समावेश आहे. छत्तीसगड हे छोटे राज्य असूनही तिथे करोनाचे ६ टक्के रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यू दर हा ३ टक्के आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरवातीलाच छत्तीसगडमध्ये संसर्ग अधिक आहे आणि मृतांची संख्याही आहे. छत्तीसगडमध्ये रोज ३८ जणांचा मृत्यू होत आहे. तर ४९०० रुग्ण आढळून येत आहेत.

५० उच्चस्तरीय मल्टी डिसिप्लनरी आरोग्य पथके  तैनात

केंद्र सरकारने महाराष्ट्र, छत्तीसगड आणि पंजाबमध्ये ५० उच्चस्तरीय मल्टी डिसिप्लनरी आरोग्य पथके  तैनात केली आहेत. त्या महाराष्ट्रातील ३० जिल्हे, छत्तीसगडमधील ११ जिल्हे आणि पंजाबमधील ९ जिल्ह्यांमध्ये जातील, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र सरकारला आरटी-पीसीआर टेस्ट वाढवण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. महाराष्ट्रात  आरटी-पीसीआर टेस्टची संख्या कमी झाली होती. गेल्या आठवड्यात एकूण चाचण्यांपैकी फक्त ६० टक्के आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आल्या. महाराष्ट्राने ७० टक्क्यांवर आरटी-पीसाआर टेस्ट करण्याची गरज आहे, असे  भूषण यांनी स्पष्ट केले.

कोरोनाने होणारे मृत्यू रोखणे आणि आरोग्य सेवा देणाऱ्या यंत्रणेची सुरक्षा करणे महत्वाचे 

कोरोनाने होणारे मृत्यू रोखणे आणि आरोग्य सेवा देणाऱ्या यंत्रणेची सुरक्षा करणे  या दोन गोष्टी या घडीला अतिशय महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच सर्वांसाठी लसीकरण मोहीम सुरू करणे  शक्य नाही, असे  भूषण यांनी स्पष्ट केले. देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गंभीर इशारा देऊनही स्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले नाही. आता करोनाने स्थिती अतिशय बिकट झाली आहे. गेल्या वेळच्या तुलनेत करोना रुग्णवाढीचा वेग हा अधिक आहे. पंतप्रधान मोदींनी जनतेच्या सहभागाचं आवाहन केलं आहे. आपण अजूनही करोनाला नियंत्रणात आणू शकतो, असं निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. तर  देशात करोनाचे ३ टक्के रुग्ण हे पंजाबमधून येत आहेत. तर देशातील करोनाने होणाऱ्या एकूण मृत्युंपैकी ४ टक्के पंजाबमधील आहेत. अॅक्टिव्ह रुग्ण आणि मृतांची संख्या पाहता दिल्ली आणि हरयाणा पंजाबपेक्षा चांगल्या स्थितीत असल्याचे भूषण म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!