Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ParambirSingNewsUpdate : मोठी बातमी : सर्वोच्च न्यालयाने परमबीर सिंग यांना दाखवला मुंबईचा रस्ता

Spread the love

नवी दिल्ली  : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावर गंभीर आरोप करीत थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले  मुंबईचे  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग  यांना  तुम्ही हायकोर्टामध्ये का गेला नाही? असा प्रश्न उपस्थित करून  बाहेरचा रास्ता दाखवला असल्याचे वृत्त आहे. परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती संजीव रेड्डी आणि न्यायमूर्ती कौल या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी झाली.


मुंबईत स्फोटकांनी गाडी सापडल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली होती तर  मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे दुखावलेल्या परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत पत्र लिहिले होते. त्यांच्या पत्राची दखल घेत नसल्याचे लक्षात आल्यावर परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर 26 मार्च रोजी सुनावणी होणार होती. पण, याचिकेवर लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर आज ही सुनावणी पार पडली.

या सुनावणीत न्यायमूर्तींनी परमबीर सिंग यांचे वकील मुकुल रोहितगी यांना विचारले की ‘तुम्ही गृह विभागाला संबंधित पक्ष का बनविला नाही? आपण अनुच्छेद 32 अंतर्गत याचिका का दाखल केली, 226 वर का गेला नाहीत? असे थेट सवाल उपस्थितीत केले. तसंच, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने ज्यांवर तुम्ही आरोप केले आहे, ते अनिल देशमुख यांना पक्ष का बनवले नाही, असा सवाल केला आणि आपण प्रथम उच्च न्यायालयात का गेला नाही? परमबीर सिंग यांनी केले आरोप हे गंभीर आहे पण हायकोर्टात याबद्दल याचिका दाखल का केली नाही. हायकोर्टाला चौकशी समिती स्थापन करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हायकोर्टामध्ये याचिका दाखल करा, अशी सूचना न्यायालयाने  दिली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!