Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneCyberCrimeUpdate : मोठी बातमी : सव्वा दोनशे कोटींवर डल्ला मारण्याचा आयटी स्कॅम उघडकीस , 10 जणांच्या टोळीत औरंगाबादचे दोघे

Spread the love

पुणे : पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने देशभरातील बड्या उद्योजकांच्या  बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून  तब्बल 216 कोटी 39 लाख रुपये  परस्पर  फस्त  करण्याचा डाव उधळून लावीत  १० जणांच्या टोळीला जेरबंद केले असून यामध्ये  औरंगाबाद येथील एका न्यूज चॅनलशी संबंधित दोघांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. सदर माहिती औरंगाबादेतील टीव्ही चॅनल शी संबंधित एका मोठ्या व्यक्तीला विकण्यात येणार होती मात्र या गैरव्यवहारापोटी पोटी  25 लाख रुपये स्वीकारताना या दहा  संशयित आरोपींना अटक केल्यामुळे एक मोठी टोळीच  यानिमित्ताने पोलिसांच्या हाती  आली आहे . न्यायालयाने यातील अटक आरोपींना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


पुण्याच्या सायबर व आर्थिक च्या उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांनी सोमवारी हा घोटाळा उघडकीस आणला . अटक करण्यात आलेल्या आयटीच्या टोळीत एका महिला इंजिनियरसह  4 इंजिनिअर, व इतर 6 असे 10 जणांचा समावेश असून पोलिसांनी त्यांच्याकडून 11 मोबाईल, 25 लाख रुपये रोख, एक डस्टर, एक क्रियेटा, 1 मोपेड असा 43 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. हा सर्व डेटा औरंगाबादच्या एका न्युज चॅनलच्या मालकास अडीच कोटी रु मध्ये विकण्याबाबत व्यवहार झाला असल्याची माहिती पोलिसांकडे होती त्यानुसार पोलिसांनी तत्काळ हि कारवाई करीत या टोळीचा पर्दापाश केला. या कारवाईने बैंकिंग व आय टी क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. वर्षानुवर्षे बंद असलेल्या  आणि काही चालू असलेल्या  बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून ती विक्री करताना या हायप्रोफाईल व्हाईटकॉलर दरोडेखोराना पुण्यात पकडण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये

१.  रविंद्र महादेव माशाळकर (वय 34, अंबाजोगाई रोड, लातूर), २. आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय 34, मुंबई), ३. मूकेश हरिश्चंद्र मोरे (वय 37, येरवडा), ४. राजशेखर यदैहा ममीडा (वय 34, हैदराबाद), ५. रोहन रवींद्र मंकणी (37, सहकारनगर), ६. विशाल धनंजय बेंद्रे (वय 45, वाशीम), ७. सुधीर शांतालाल भटेवरा उर्फ जैन (वय 54, सिंहगड रोड), ८. राजेश मुन्नालाल शर्मा (वय 42, औरंगाबाद), ९. परमजित सिंग संधू (42, औरंगाबाद) आणि १०.  अनघा अनील मोडक (वय 40, वडगाव बुद्रक) आदींचा समावेश आहे तर या प्रकरणाशी संबंधित संशयितांना नोटीस दिल्या आहेत.

पोलीस तपासानुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी रवींद्र माशाळकर, मुकेश मोरे, आत्माराम कदम आणि वरुण वर्मा हे चौघे बँक खात्यांचे गोपनीय डेटा स्टोअर करण्याची जबाबदारी असलेल्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी करीत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे या कंपनीमधील इतर व्यक्तीही या कटामध्ये सहभागी आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत.

पुणे सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी या प्रकरणात फिर्याद दिली असून त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  आरोपींनी एकत्रित येऊन काही नामांकित बँकातील डोरमंट अकाऊंट  (निष्क्रिय खाते) आणि काही ऍक्टिव्ह बँक खात्याची माहिती अनधिकृतपणे मिळवली होती. या सर्व बँक खात्यात जवळपास 216 कोटी 29 लाख रुपये होते. दरम्यान, ही चोरलेली माहिती औरंगाबाद येथील  एका न्युज चॅनलच्या मालकाला सदर आरोपी विक्री करणार होते पण त्याची खबर आधीच सायबर सेलला मिळाली. यानंतर सायबर पोलीस गेल्या आठ दिवसापासून या टोळीच्या मागावर होते. अखेर काल त्यांना सिंहगड रोड परिसरात त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून  प्राथमिक तपास केल्यानंतर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटक्के, सहाय्यक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार वाघचौरे, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे व त्यांच्या पथकाने केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक कुमार घाडगे करत आहेत. सदर आरोपी हे हाय प्रोफाईल असून, आयटी क्षेत्रात गेल्या  10 वर्षांपासून  विविध प्रसिद्ध आय टी कंपनीत त्यांनी काम केलेले आहे. देशातील बड्या भांडवलदारांच्या बंद आणि चालू बँक खात्याची गोपनीय माहिती चोरून घेऊन त्यांचे पासवर्ड तयार करून अशा खात्यावरून पैसे इतर खात्यावर वळवून घ्यायचा त्यांचा डाव होता.

या व्यवहारात मध्यस्थ म्हणून अनघा मोडक होती. त्यानुसार 25 लाख देऊन जवळपास अडीच कोटीं रुत डाटा विक्री करण्यात येणार होता. दरम्यान हा डेटा खरेदी करण्यासंबंधी व्यवहार करणाऱ्या या व्यक्तीलाही  पोलिसांनी नोटीस दिली असून, तो औरंगाबाद शहरातील एका न्यूज चॅनेलचा मालक असल्याची माहिती उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांनी दिली.पोलीस चौकशीनंतर लवकरच या व्यक्तीलाही अटक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले . सदर आयटी टोळीला अशा गोपनीय खात्यांची माहिती देणारांच्या मागे बँकेतील बडे अधिकारीही गुंतण्याची शक्यता असून पोलीस त्यादृष्टीनेही अधिक तपास करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!