#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : औरंगाबादच्या लॉकडाऊन असा झाला निर्णय , जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update
केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
#CurrentNewsUpdate
राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार
7.36 PM | 07 MAR 2021 : औरंगाबाद : मी मास्क घालणार नाही म्हणत विना मास्क फिरणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या आवाहनामुळे अॅड.रत्नाकर चौरे यांनी केली राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात साथीचे रोग प्रतिबंधक कायदा 1897 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी तक्रारदारांनी केली आहे. राज यांच्या मास्कविरोधी भूमिकेमुळे राज्यात कोरोना वाढल्याचा आरोप यात करण्य़ात आला आहे.
07.15 PM | 07 MAR 2021 : औरंगाबाद शहरात येणाऱ्या प्रत्येक शनिवारी व रविवारी पूर्ण लॉकडाऊन
औरंगाबादमध्ये 11 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत शहरात अंशतः लॉकडाऊन
शहरात आठवडी बाजार, जलतरण तलाव, सर्व कार्यक्रम, आंदोलन शाळा, मॉल बंद असतील
ज्या आस्थापना सुरु आहेत त्यांना दर 15 दिवसाला आर टी पी सी आर टेस्ट करणे गरजेचे
शहरातील लॉन, मंगल कार्यालय बंद ठेवणार, लग्ना परवानगी नाही. रजिस्टर मॅरेज करण्यासाठी व्यवस्था उभारणार
रिक्षा वाहतुकीवर निर्बंध, मास्क आणि प्रवाशी सांख्य नियमानुसार असणे बंधनकारक
औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती
06:40 PM | 07 MAR 2021 : औरंगाबाद – 15 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ, पूर्ण लॉकडाऊनपेक्षा अंशत: लॉकडाऊन लावणार, 11 मार्चपासून रात्री 12 ते 4 एप्रिलपर्यंत नवीन नियमावली लागणार, त्यानंतर रुग्ण वाढले तर लॉकडाऊन लागणार; राजकीय-सामाजिक सभा, आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय बंद असणार, औरंगाबाद शहरातील मंगल कार्यालय बंद राहणार, विवाह सोहळे होणार नाहीत; औरंगाबादेत प्रत्येक शनिवारी, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन राहणार -जिल्हाधिकारी
5:19 PM | 07 MAR 2021 : औरंगाबादमध्ये लॉकडाऊन होणार का? जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी बैठक सुरू पोलीस आयुक्त निखिल गुप्ता बैठकीला मनपा आयुक्त अस्तिककुमार पांड्ये उपस्थित.
4:04 PM | 07 MAR 2021 : सात दिवसांपूर्वी हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली होती, ही संचारबंदी उद्यापासून उठणार आहे. मात्र, रुग्ण संख्या कमी न झाल्याने रात्रीची संचारबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी कायम ठेवली आहे. दिवसा जरी बाजारपेठ खुली करण्यात येत असली तरी रात्री 7 ते सकाळी सातपर्यंत सर्व प्रकारची बाजारपेठ बंदच राहणार आहे महत्त्वाचे म्हणजे सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने सुरू करताना आपण निगेटिव असल्याचे प्रमाणपत्र ठेवणे बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर हॉटेल, बार, शाळा महाविद्यालय धार्मिक स्थळ बंद राहणार आहेत. केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना पार्सल देण्याची मुभा असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आज याबाबत आज आदेश काढले आहेत. त्याचबरोबर सर्वांना कोरोना बाबतचे नियम पाळण्याचे आवाहनही केले आहे.
11:43 AM | 07 MAR 2021 : औरंगाबाद लॉकडाऊन संदर्भात निर्णय संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त, ग्रामीणच्या एस पी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त पत्रकार परिषद
11:27 AM | 07 MAR 2021 : नाशिकमध्ये प्रस्तावित असलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने 26 मार्च, 27 मार्च आणि 28 मार्चला होणारे साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाच्या औरंगाबादमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी दिली आहे.
8:34 AM | 07 MAR 2021 : टप्प्या-टप्प्याने निर्बंध कठोर करणे किंवा लॉकडाऊन हाच पर्याय उरला आहे असा नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नाशिकरांना इशारा दिला आहे. दंड आकारूनही नागरिक ऐकत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागेल असे मांढरे यांनी म्हटले आहे.