Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : संजय राठोड प्रकरणी देवेद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

Spread the love

मुंबई: बहुचर्चित पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षावर हल्ला बोल करताच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. ‘यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये जे घडलं ते खरं की खोटं? माध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या क्लिप्स खऱ्या की खोट्या?,’ याचे  उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे ,’ अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

विधानभवनाच्या आवारात ते माध्यमांशी बोलत होते. संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल विरोधी पक्षावर जोरदार टीका केली होती. त्याचा फडणवीस यांनी समाचार घेतला. ‘संजय राठोड यांच्या संदर्भातील प्रश्नांना उत्तरं देताना मुख्यमंत्र्यांची स्थिती केविलवाणी झाली होती. सगळे पुरावे असताना जणू काही घडलेच नाही, असे  जेव्हा सांगावे  लागते , त्यावेळी नैतिक धैर्य साथ देत नाही. मास्क असतानाही चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसत होते,’ असा खोचक टोमणा फडणवीस यांनी हाणला. ‘यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये जे घडले  ते खरे  की खोटे  ? क्लिप्स खऱ्या की खोट्या?, अशी विचारणा करतानाच, ‘तुम्हाला कोणाला साधू संत ठरवायचे  असेल तर ठरवा, पण मग तुमची नैतिकता काय आहे हे जनतेसमोर येते ,’ असेही फडणवीस म्हणाले.

मोहन डेलकर प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  खा.  मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी उपस्थित केलेल्या मुद्यांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले कि ,  ‘सुसाईड नोट मिळाल्यावर पोलीस चौकशी होतेच, ती व्हायलाच हवी. खरे तर डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये एकाही भाजप नेत्याचे  नाव नाही. त्यामुळंच नावे  जाहीर केली जात नाहीत,’ असा दावाही फडणवीस यांनी केला.

दरम्यान ‘काँग्रेसची सायकल रॅली हा निव्वळ फार्स होता. गुजरातसह इतर ९ राज्यांपेक्षा महाराष्ट्रात पेट्रोल दहा रुपयांनी महाग आहे. राज्य सरकार पेट्रोलवर २७ रुपये कर लावते. याउलट केंद्र सरकारला पेट्रोलवरील करातून ३३ रुपये मिळतात. त्यातील ४ रुपये कृषी सेस आणि ४ रुपये डिलरचे कमिशन असते. उर्वरीत पैशातले ४२ टक्के पैसे राज्याला परत केले जातात,’ असं ते म्हणाले. ‘राज्य सरकारच्या करामुळंच इथं पेट्रोल महाग आहे. काँग्रेसचे  आंदोलन राज्य सरकारच्या कराविरोधात असावे ,’ असा चिमटाही त्यांनी काढला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!