#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : संजय राठोडांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सर्व आरोप फेटाळले

वनमंत्री संजय राठोड यवतमाळमध्ये सकाळी 9 वा. पोहरादेवीकडे निघणार, ते 15 दिवसांनी मीडियासमोर येणार त्यामुळे पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे .
संजय राठोड यांनी सर्व आरोप फेटाळले :
पूजा चव्हाणचा मृत्यू दुर्दैवी, ‘पूजाच्या मृत्यूबद्दल बंजारा समाजाला दु:ख’ चव्हाण कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. पूजा चव्हाण मृत्यूवरून घाणेरडं राजकारण केलं जातंय मी त्याचा निषेध करतो, माझ्यावरील आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे चौकशीत सर्व गोष्टी स्पष्ट होतील आणि पोलीस तपासातून सत्य बाहेर येईल. माझे आयुष्य उद्ध्वस्थ करण्याचा प्रयत्न करू नका.
समाजमाध्यमातून जे दाखवले त्यात सत्य नाही मी 15 दिवस नाही, 10 दिवस नव्हतो मी 10 दिवस कुटुंब सांभाळत होतो. दरम्यान, मुंबईच्या घरातून शासकीय कामकाज देखील सुरू होते’ ‘माझी, कुटुंबाची आणि समाजाची बदनामी थांबवा. असे बोलून वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले
1:53 PM | 23 FEB 2021 : पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत जे घाणेरडं राजकारण केलं जातंय मी त्याचा निषेध करतो- संजय राठोड
12:56 PM | 23 FEB 2021 : एकीकडे मुख्यमंत्री मास्क घाला, असे अवाहन करतात तर दुसरीकडे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत हे गंभीर आहे उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि ठाकरी बाणा दाखवावा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
12:40 PM| 23 FEB 2021 : वनमंत्री संजय राठोड पोहरादेवी येथे पोहोचले, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष
12:18 PM| 23 FEB 2021 : संजय राठोड पोहरादेवी मंदिरात पोहोचणार आहेत. त्यांनी मंदिरात तरी खरं बोलावं. पोहरादेवी मंदिर हे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी आलेल्या व्यक्तीने खरं तेच बोललं पाहिजे. पूजा चव्हाणच्या चुलत आजीची प्रतिक्रिया
12:04 PM | 23 FEB 2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतरही पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
10:57 AM | 23 FEB 2021 : वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीसाठी रवाना
10:58 AM | 23 FEB 2021 : वाशिम पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते आणि बंजारा समाजाचे नागरिक दाखल व्हायला सुरुवात
कसा आहे संजय राठोड यांचा दौरा?
- सकाळी 9 वाजता : वाशिमच्या मानोरा तालुक्यातील श्री क्षेत्र पोहरागडकडे रवाना होणार
- सकाळी 11.30 वाजता : श्री श्रेत्र पोहरागड इथे आगमन आणि दर्शन
- दुपारी 1 वाजता : दारव्हा तालुक्यातील श्री क्षेत्र मुंगसाजी महाराज संस्थान धामनगाव देवकडे रवाना होणार
- दुपारी 2.30 वाजता : श्री क्षेत्र मुंगसाजी महाराज संस्थान धामनगाव देव इथे आगमन आणि दर्शन
- दुपारी 3.30 वाजता : यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार
- दुपारी 4.30 वाजता : जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन, यवतमाळ जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेबाबत आयोजित बैठकीला उपस्थित राहणार. त्यानंतर यवतमाळमधील निवासस्थानाकडे रवाना होणार