Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#LIVE | MahanayakCurrentNewsUpdate : जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी

Spread the love

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाचे घडामोडी.

#Current News Update

आज सायंकाळी 4:38 वाजता उत्तराखंडमधील पिथौरागडमध्ये भूकंपचा तीव्रतेचा धक्का बसला.

 

कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मृती दिनी आयोजित कन्हैया कुमार यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, उद्या कोल्हापुरातील दसरा चौकात होणार होती कन्हैया कुमार यांची सभा, पोलीस प्रशासनाकडून दडपशाही सुरू असल्याचा कार्यकर्त्यांकडून आरोप, जिल्हाधिकारी परवानगी देतात तर पोलीस का देत नाहीत असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

 

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीएमसी अधिकाऱ्यांसोबत शिवाजी पार्क नूतनीकरणच्या आढावा घेतला. बीएमसीकडून शिवाजी पार्क नूतनीकरणचे काम सुरू आहे. पार्कात मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य असल्याने प्रदूषण कमी व्हावे यासाठी शिवाजी पार्क नूतनीकरणचा प्रकल्प राबवाला जातो. मात्र याआधी मनसेने रेन वॉटर हारवेस्टिंग व इतर प्रकल्पाची कामे करून शिवाजी पार्कवरील धूळ कमी करण्यासाठीचे काम केले असताना त्या आधी झालेल्या कामाची स्थिती व त्याबद्दलची सुद्धा माहिती यावेळी घेतली गेली. नूतनीकरण करत असताना बीएमसी मनसे ने केलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कामाचे काय झाले ? बीएमसीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रदूषण वाढत असून यामध्ये राजकारण न करता शिवाजी पार्क वर हिरवळ व्हावी व या ठिकणाचा त्रास कमी व्हावा यासाठी हा आढावा असल्याच, मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले आहे.

भंडारा रुग्णालय आग प्रकरण : दोषी डॉक्टरांना सोडून कंत्राटी नर्सवर 39 दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे.

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 8 जानेवारीच्या मध्यरात्री नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या संदर्भात चौकशी समिती नेमली असून जिल्हा शल्य चिकित्सकांसह 7 लोकांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे. या संदर्भात 39 दिवसानंतर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यात दोन कंत्राटी कर्मचारी स्मिता आंबीलढुके आणि शुभांगी साठवणे यांचा समावेश असून दोषी डॉक्टरांना मात्र वाचविण्यात आल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.

 

#CoronaUpdate

नागपूर महापालिका : कोरोना प्रतिबंधात्मक पाऊल म्हणून नागपूर महापालिकेने उचलले कडक पाऊल, नागरिकांसाठी जाहीर केली नवीन आचारसंहिता, अंत्यविधीमध्ये 20 पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीवर आणली बंदी, अंत्यविधीत मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक, हॉटेलमध्ये एकूण क्षमतेच्या 50 टक्केच उपस्थिती ठेवणं बंधनकारक, फ्लॅट स्कीममध्ये 5 पेक्षा जास्त आणि गल्लीमध्ये 20 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास प्रतिबंधित क्षेत्र घोषित होणार, होम क्वारंटाईन व्यक्तींना घराबाहेर जाण्यास बंदी

 

यवतमाळ, अकोला, अमरावती इथे 50% पॅझिटीव्हीटी आढळून आली आहे. ग्रामीण, शहरे सर्वत्र प्रसार झाला आहे. त्यामुळे तातडीने सर्वसामान्यांसाठी लसीकरण सूरू करावे, अशी मागणी राज्य कोविड निवारण टिमचे तांत्रिक सल्लागार सुभाष साळुंके यांनी केली आहे.

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व आस्थापना आणि दुकाने सोमवार ते शुक्रवार या काळात रात्री आठ वाजता बंद करण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला. जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व व्यवहार दर आठवड्यातील शनिवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी 8 पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश यापूर्वीच जारी आहे. आता सोमवार ते शुक्रवार दरम्यान रोज सर्व दुकाने रात्री आठला बंद होतील. त्यानुसार अमरावती शहर व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे बाजार, दुकाने, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, चहा-नाश्ता उपाहारगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, पानटपरी, इतर वस्तूंची दुकाने, सिनेमागृहे, उद्याने, पर्यटनस्थळे रात्री आठला बंद होतील. या आदेशातून सर्व औषधे विक्री दुकाने, रुग्णालये, प्रसृतीगृहे, कदवाखाने, वैद्यक प्रयोगशाळा, रुग्णवाहिका आदी सेवांना वगळण्यात आले आहे.

राज्यमंत्री बच्चू कडूंना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, ट्वीट करुन दिली माहिती, त्यांनी म्हटलंय की, माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.

नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना कोरोनाची लागण, दोन दिवसांपूर्वीच घेतली होती कोरोनाची लस, कुटुंबातील 3 जणांचे अहवाल निगेटिव्ह विभागीय आयुक्त मात्र पॉझिटिव्ह.

 

#RainUpdate

राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईचा अंदाज घेऊन सरकार लवकर पंचनामे सुरू करणार, जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना देण्यात आल्या असून उद्या यावर बैठक बोलावली असल्याची विजय वडेट्टीवार  यांनी दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस.

परभणी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. मध्यरात्री सर्वत्र विजांच्या गडगडाटा सह वादळी वारे आणि पाऊस झालाय तर पहाटे पावसाचा जोर कमी होऊन पावसाची चांगलीच रिपरिप सुरुय. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहु, हरभरा,ज्वारीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

नांदेड जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांना मोठा फटका बसलाय. तर मध्यरात्री पासून जिल्हयात सर्वत्र विजांच्या गडगडाटा सह वादळी वारे आणि पाऊस सुरू झालाय .मध्यरात्री पासून सुरू असलेल्या पावसाचा जोर मात्र सकाळ झाली तरी ,कमी झाला नाहीय .त्यामुळे पावसाची चांगलीच रिपरिप सुरुय.या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहु, केळी, भुईमूग,हरभरा,ज्वारीचे मोठे नुकसान, होण्याची शक्यता आहे.गेल्या दोन दिवसापासून चालू असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांत मात्र चिंतेचे वातावरण आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!