Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने पकडला १ क्विंटल ११ किलो गांजा ; २५ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Spread the love

औरंंगाबाद : पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना जेरबंद करीत त्यांच्या जवळून जवळपास २२ लाख ३४ हजार रूपये किंमतीचा १ क्विंटल ११ किलो ७० ग्रॅम वजनाचा गांजा, एक रिक्षा, एक दुचाकी, चार मोबाईल, रोख रक्कम असा एकूण २५ लाख ८२ हजार ४८० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.२) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास जालना रोडवरील केंब्रीज हयस्कूल चौकात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख शोएब शेख मुनीर (वय २०, रा.रहेमानिया कॉलनी), बख्तीयार खान जहांगीर खान उर्फ राजा (वय ३६, रा.किराडपुरा, शरीफ कॉलनी), शेख शाहरूख शेख समद (वय २३, रा.टाऊनहॉल, आसेफिया कॉलनी) अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गांजाची तस्करी करणाऱ्यांची नावे आहेत. जालना रोडवरील केंब्रीज चौकातून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाला मिळाली होती. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक राहुल रोडे, पोलिस अंमलदार सय्यद शकील, इम्राण पठाण, ए.आर.खरात, मनोज विखनकर, विजय निकम, व्ही.जे.आडे, व्ही.एस.पवार, पोलिस फोटोग्राफर राजेंद्र चौधरी आदींनी जालना रोडवरील केंब्रीज चौकात सापळा रचून पहाटे साडेतीनच्या सुमारास रिक्षा क्रमांक (एमएच-२०-ईएफ-५५८२) व एक विनाक्रमांकाची दुचाकी पकडली. पोलिसांनी रिक्षाची झडती घेतली असता, त्यामध्ये जवळपास २२ लाख ३४ हजार रूपये विंâमतीचा १ क्विंटल ११ किलो ७० ग्रॅम गांजा मिळून आला.
याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गांजाची तस्करी करणाऱ्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!