बावीस वर्षापासून फरार असलेला घरफोड्या गजाआड

औरंंगाबाद : टिव्ही सेंटर परिसरातील सुदर्शननगर येथे घरफोडी करणाऱ्या दोघांना गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांच्या ताब्यातून पोलिसांनी २२ हजार रूपये किंमतीचे सोने-चांदीचे दागीने जप्त केले असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी शनिवारी (दि.९) कळविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारासिंग विठ्ठल निमरोठ (वय २७, रा. जनुना, पो.गुम्मी, जि.बुलढाणा, ह.मु.आर्शिवाद बिल्डींगजवळ, मिसारवाडी), एकनाथ गंगाराम शिंदे (वय २६, रा.रा. जनुना, पो.गुम्मी, जि.बुलढाणा) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चोरट्यांची नावे आहेत. टिव्ही सेंटर परिसरातील सुदर्शनगरात तारासिंग निमरोठ याने घरफोडी केली असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस अंमलदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, विशाल पाटील, आनंद वाहुळ, रितेश जाधव, नितीन देशमुख आदींच्या पथकाने सापळा रचून तारासिंग निमरोठ व एकनाथ शिंदे यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी तारासिंग निमरोठ याच्या घराची झडती घेतल असता चोरीचा २२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. गुन्हेशाखेच्या ताब्यात असलेल्या दोन्ही आरोपींना सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
बावीस वर्षापासून फरार असलेला घरफोड्या गजाआड
औरंंगाबाद : जामीनावर सुटल्यानंतर गेल्या २२ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस गुन्हेशाखा पोलिसांनी गजाआड केले. ही कारवाई ८ जानेवारी रोजी तिसगांव येथे करण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी शनिवारी (दि.९) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर बन्सी साखरे (वय ४६, रा. रा.हिरवड, ता.लोणार, जि.बुलढाणा) असे पोलिसांनी २२ वर्षानंतर गजाआड केलेल्या आरोपीचे नाव आहे. शंकर साखरे याने भाऊसाहेब बालाजी धिवर (रा.बालाजीनगर) याच्या मदतीने २२ वर्षापूर्वी २१ ऑगस्ट १९९७ रोजी सिडको एन-३ परिसरातील रहिवासी महेंद्र दिलीपचंद्र कोठारी यांच्या घरी चोरी केली होती. त्यावेळी साखरे व धिवर यांनी महेंद्र कोठारी यांच्या घरातून ३७ हजार रूपये विंâमतीचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी मुवुंâदवाडी पोलिसांनी शंकर साखरे याला अटक केली होती. त्यावेळी शंकर साखरे याने न्यायालयातून जामीन घेतला होता. तेंव्हापासून तो फरार होता.
दरम्यान, गेल्या २२ वर्षापासून फरार असलेला शंकर साखरे हा तिसगांव येथे आला असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश धोंन्डे, पोलिस अंमलदार तुकाराम राठोड, सैय्यद मुजीब अली, भावसिंग चव्हाण, राहुल खरात, सचिन घुगे आदींच्या पथकाने तिसगाव परिसरात सापळा रचून शंकर साखरे याला गजाआड केले.