अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू, एक जण जखमी

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंगाबाद : भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो जीपने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या शुभम काकाजी लोखंडे (रा.आंबेडकरनगर, गल्ली नंबर ८) या तरूणाचा उपचारादरम्यान खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. तर त्याचा मित्र हर्षद उर्फ रोहित विजय गडवे (रा.आंबेडकरनगर) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात ५ जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास जळगाव रोडवरील रेणूका माता मंदिरासमोरील हॉटेल साई पालखी समोर घडला होता.

Advertisements

शुभम लोखंडे व त्याचा मित्र हर्षद उर्फ रोहित गडवे हे दोघेही दुचाकीवर जळगाव रोडने आंबेडकरनगरकडे जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने जात असलेल्या बोलेरो जीप क्रमांक (एमएच-०४-एचडी-६८८५) ने त्यांच्या दुचाकीस धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शुभम लोखंडे व हर्षद उर्फ रोहित गडवे यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना शुभम लोखंडे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत शुभम लोखंडे याचा भाऊ ऋषिकेश काकाजी लोखंडे (वय २०, रा.आंबेडकरनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोलेरो जीपचालकाविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बुधा शिंदे करीत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!