Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पीएम मोदी साधणार उद्या शेतकऱ्यांशी संवाद पण उत्तर प्रदेशातल्या , आंदोलक शेतकऱ्यांशी नव्हे !!

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने उद्या दि . २५ डिसेंबरला म्हणजेच शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत पण आंदोलक शेतकऱ्यांशी नव्हे तर उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांशी. आपल्या व्हर्चुअल भाषणात ते अयोध्येतील शेतकऱ्यांना कृषी कायद्यांमधली वैशिष्ट्ये समजावून सांगतील आणि त्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजपा कार्यकर्ते हे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचं पत्र घरोघरी पोहोचवतील असा हा कार्यक्रम आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी अयोध्येत शेतकऱ्यांसाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने अयोध्येत एकूण ३७७ ठिकाणी तर संपूर्ण उत्तर प्रदेशात सुमारे अडीच हजार ठिकाणी शेतकऱ्यांना या कार्यक्रमाशी ऑनलाईन जोडलं जाणार आहे.

 

दरम्यान केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या पीएम किसान योजनेचा या वर्षातील तिसरा हप्ता २५ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधानांनी ही माहिती दिली होती. या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. या आधीचे हप्ते हे कोरोना काळात जमा करण्यात आले होते. आता तिसरा हप्ता हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत.

पीएम किसान योजना अर्थात शेतकरी सन्मान नीधी योजना २०१९ पासून लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत वर्षातून तीन वेळा प्रत्येकी दोन हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. आतापर्यंत 96 हजार कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचा दावा केंद्र सरकार करत आहे. या योजनेचं वार्षिक बजेट हे ७५ हजार कोटी रुपये इतकं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!